सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी.
June 29th, 08:00 am
सेशेल्सचे राष्ट्रपती महामहीम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. सेशेल्समधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.पंतप्रधानांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट.
June 28th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिक्टोरिया, माहे येथे मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान रामगुलाम यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पदभार स्विकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही चौथी भेट आहे.पंतप्रधानांची सेशेल्सला अधिकृत भेट
June 28th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 27 ते 29 जून 2026 या कालावधीतील सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून, आज व्हिक्टोरिया, माहे येथील 'स्टेट हाऊस'मध्ये आयोजित बैठकीत पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यात अधिकृत चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा समावेश होता. आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी, डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास, सामाजिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, सागरी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली; यामध्ये बेकायदेशीर मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी आणि समुद्री चाचेगिरी यांसह हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने या मुदद्यांचाही समावेश होता. भारताने जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत विविध प्रकल्प आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.पंतप्रधानांचा सेशेल्स दौरा : फलनिष्पत्तीची यादी
June 28th, 08:17 pm
सेशेल्स सरकारला एक जलदगती गस्ती नौका भेट म्हणून देणेसेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीतील पंतप्रधानांचे भाषण
June 28th, 05:00 pm
पंतप्रधान म्हणून मी हिंदी महासागर क्षेत्रातील ज्या देशाला 2015 मध्ये सर्वप्रथम भेट दिली होती, तो देश म्हणजे 'सेशेल्स' होता. माझी ती पहिली आफ्रिका भेटही होती. मी इथे आलो कारण माझा हा दृढ विश्वास होता की, हिंदी महासागराबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनात सेशेल्सला एक अतिशय विशेष स्थान आहे. आज, एका दशकानंतर जेव्हा मी इथे पुन्हा आलो आहे, तेव्हा माझा हा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला आहे.सेशेल्सच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
June 28th, 02:02 pm
त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत.पंतप्रधान मोदी यांचे सेशेल्समध्ये उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
June 27th, 03:30 pm
पंतप्रधान मोदींचे सेशल्समध्ये आगमन झाले असून विमानतळावर राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी पारंपारिक नृत्याचे एक विशेष सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले. हा दौरा भारत-सेशल्समधील जवळचे आणि जुने संबंध अधोरेखित करतो, ज्यामध्ये विविध क्षेत्रांतील सहकार्य मजबूत करण्यावर भर असेल. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी सेशल्सच्या नेतृत्वासोबत चर्चा करतील.