पंतप्रधानांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आइसलँडच्या पंतप्रधानांची भेट घेतली
May 19th, 06:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ओस्लो येथे आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टर्न फ्रॉस्टडॉटिर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 19th, 06:40 pm
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 19th, 04:25 pm
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.नॉर्वे-भारत व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 18th, 11:49 pm
नॉर्वे आणि भारताच्या व्यावसायिक आणि संशोधन समुदायांच्या दरम्यान आज येथे उपस्थित राहता मला अतिशय आनंद होत आहे. मला काही सहभागींचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली, आणि त्यांचे विचार ऐकून आपल्या भागीदारीचा पाया अत्यंत मजबूत असल्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान झाले सहभागी
May 18th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओस्लो येथे भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत सहभागी झाले. या शिखर परिषदेत महामहीम युवराज हाकोन आणि नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर देखील सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
May 18th, 08:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर यांच्यासोबत ओस्लो इथे द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून, पंतप्रधान स्टोर यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे ओस्लो विमानतळावर आगमन झाल्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले.पंतप्रधानांची नॉर्वेचे राजे महामहीम किंग हॅराल्ड पाचवे यांच्याशी भेट
May 18th, 07:36 pm
पंतप्रधान मोदींनी ओस्लो येथील रॉयल पॅलेसमध्ये नॉर्वेचे राजे महामहीम किंग हॅराल्ड पाचवे यांची भेट घेतली, जिथे दोन्ही नेत्यांनी वाढत्या भारत-नॉर्वे भागीदारी आणि विविध क्षेत्रांमधील, विशेषतः नवीन तंत्रज्ञानातील प्रगतीवर चर्चा केली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट ग्रँड क्रॉस प्रदान
May 18th, 07:35 pm
ओस्लो येथे आयोजित एका विशेष समारंभात, नॉर्वेचे महामहीम राजे हेराल्ड पंचम यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा नॉर्वेचा परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असून, नॉर्वेच्या हितासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेच्या सन्मानार्थ तो दिला जातो.नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 18th, 04:44 pm
मी गेल्या वर्षीच नॉर्वेच्या दौऱ्यावर येणार होतो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तो दौरा मला स्थगित करावा लागला. त्या कठीण कालखंडात नॉर्वेने दहशतवादाविरोधात भारतासोबत खंबीरपणे उभे राहून खऱ्या मैत्रीची प्रचिती दिली. आज नॉर्वेमध्ये आलेलो असताना, त्या वेळी दाखवलेल्या एकजुटीबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो.