संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 07:46 pm
कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कुवेतच्या पंतप्रधानांची भेट
December 22nd, 06:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि परस्पर संबंध यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठीच्या आराखड्यावर चर्चा केली.फलनिष्पत्तींची यादी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेतला भेट (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 06:03 pm
हा सामंजस्य करार संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला संस्थात्मक रूप प्रदान करेल. सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कर्मचारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त सराव, संरक्षण उद्योगात सहकार्य, संरक्षण उपकरणांचा पुरवठा तसेच संशोधन आणि विकासामध्ये सहकार्य यांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या अमीरांची भेट
December 22nd, 05:08 pm
यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि कुवेतमधील मजबूत, ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा केली. तसेच द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी व दृढ करण्यासाठी आपली पूर्ण वचनबद्धता व्यक्त केली. या अनुषंगाने, द्विपक्षीय संबंधांना ‘कूटनीतिक भागीदारी’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
December 22nd, 04:37 pm
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते.Prime Minister attends Arabian Gulf Cup as Guest of Honour of His Highness the Amir of Kuwait
December 21st, 10:24 pm
On the invitation of His Highness Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah, the Amir of Kuwait, Prime Minister Shri Narendra Modi attended the opening ceremony of the 26th Arabian Gulf Cup in Kuwait as his ‘Guest of Honour’.रामायण आणि महाभारताच्या अरबी भाषेतील भाषांतराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची केली प्रशंसा
December 21st, 07:03 pm
रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर करून, हे भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांनी कुवेतमधील लेबर कॅम्पला दिली भेट
December 21st, 07:00 pm
कुवेत भेटीच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील मीना अब्दुल्ला भागातल्या लेबर कॅम्पला भेट दिली, जिथे जवळजवळ 1500 भारतीय नागरिक काम करतात. पंतप्रधानांनी भारतातील विविध राज्यांतून तिथे आलेल्या मजुरांशी संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली.कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादाचा कार्यक्रम ‘हाला मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 21st, 06:34 pm
मी आत्ताच अवघ्या अडीच तासांपूर्वी कुवेतला पोहोचलो आणि इथे पाऊल ठेवल्यापासून आजूबाजूला एक वेगळीच आपुलकी, एक वेगळीच मायेची ऊब जाणवत आहे. तुम्ही सर्व भारतातील विविध राज्यांतून आला आहात. पण तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की जणू भारताचे लघुरूपच (मिनी इंडिया) माझ्यासमोर उभे राहिले आहे. इथे भारताच्या उत्तर-दक्षिण-पूर्व पश्चिमे कडील प्रत्येक प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक माझ्यासमोर दिसत आहेत. पण प्रत्येकाच्या हृदयात एकच पडसाद आहे…. प्रत्येकाच्या हृदयात एकच निनाद आहे - भारत मातेचा विजय असो….,.भारत मातेचा विजय असो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या कार्यक्रमात भारतीय समुदायाला केले संबोधित
December 21st, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतमधील शेख साद अल - अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या, कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाला संबोधित केले. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त
December 21st, 06:16 pm
कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधान मोदी कुवेतमध्ये दाखल
December 21st, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुवेतमध्ये आगमन झाले. भारताच्या पंतप्रधानांची या देशाला भेट देण्याची 43 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी कुवेतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी चर्चा करणार आहेत. ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार असून अरब गल्फ कपच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेतकुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
December 21st, 09:21 am
कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल - अहमद अल - जाबेर अल - सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे.