पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॉर्डन भेटीदरम्यान जारी केलेले संयुक्त निवेदन

December 16th, 03:56 pm

महामहीम राजे अब्दुल्ला द्वितीय बीन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15- 16 डिसेंबर 2025 मध्ये जॉर्डनला भेट दिली.

भारत-जॉर्डन व्यापार बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन

December 16th, 12:24 pm

जगात अनेक देशांच्या सीमा जोडलेल्या असतात तर काही देशांच्या बाजारपेठा जोडल्या जातात. परंतू भारत आणि जॉर्डन यांचे संबंध असे आहेत जिथे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातील आर्थिक संधी यांचे एकत्रीकरण होते.

पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित

December 16th, 12:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते. राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त केली आणि दोन्ही देशांच्या उद्योजकांना क्षमता व संधींचे रूपांतर विकास आणि समृद्धीमध्ये करण्याचे आवाहन केले. जॉर्डनचे मुक्त व्यापार करार आणि भारताची आर्थिक शक्ती यांच्या संयोगातून दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया व त्यापुढील प्रदेशांदरम्यान एक आर्थिक मार्गिका तयार केली जाऊ शकते, असे जॉर्डनच्या राजांनी नमूद केले.

List of Outcomes Visit of Prime Minister to Jordan

December 15th, 11:52 pm

During the meeting between PM Modi and HM King Abdullah II of Jordan, several MoUs were signed. These include agreements on New and Renewable Energy, Water Resources Management & Development, Cultural Exchange and Digital Technology.

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

December 15th, 11:00 pm

माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे स्नेहपूर्ण स्वागत केल्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.भारत आणि जॉर्डन यांच्यातले संबंध नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण अतिशय सकारात्मक कल्पना मांडल्या आहेत.आपली मैत्री आणि भारताप्रती कटिबद्धता यासाठी मी आपले हार्दिक आभार मानतो.

पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतली

December 15th, 10:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतली. जॉर्डनच्या राजांच्या अल हुसैनिया राजवाडा या निवासस्थानी मोदी यांचे आगमन झाल्यानंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांनी त्यांची स्नेहपूर्ण वातावरणात भेट घेतली आणि त्यांचे औपचारिक पद्धतीने स्वागत केले.

जॉर्डनमधील अम्मान येथे पंतप्रधानांचे विशेष स्वागत

December 15th, 04:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्मान येथे दाखल झाले आहेत. उभय देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून अम्मान विमानतळावर आगमन झाल्यावर जॉर्डनचे पंतप्रधान डॉ. जाफर हसन यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.

जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

December 15th, 08:15 am

आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्‍यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत.