पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील मियागी या राज्यातील सेंडाय येथील सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिली भेट
August 30th, 11:52 am
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान माननीय श्री. शिगेरू इशिबा यांच्यासह आज मियागी राज्यामधील सेंडाय चा दौरा केला. सेंडायमध्ये दोन्ही नेत्यांनी टोकियो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेड (TEL Miyagi) या सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या जपानी कंपनीला भेट दिली. TEL कंपनीची जागतिक सेमीकंडक्टर मूल्यसाखळीत असलेली भूमिका, तिची प्रगत उत्पादन क्षमता तसेच भारतासोबत सध्या सुरू असलेल्या आणि नियोजित सहकार्याबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली. या कारखान्याच्या भेटीद्वारे दोन्ही नेत्यांना सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, उत्पादन (फॅब्रिकेशन) आणि चाचणी( टेस्टिंग) या क्षेत्रांत भारत–जपान यांच्यातील सहकार्याच्या संधींचा प्रत्यक्ष आढावा घेता आला.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.पंतप्रधानांनी जपानच्या विविध प्रांतांच्या राज्यपालांशी संवाद साधला.
August 30th, 07:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानच्या विविध प्रांतांच्या राज्यपालांशी संवाद साधला. या संवादामध्ये सोळा राज्यपाल सहभागी झाले होते.फॅक्ट शीट: भारत-जपान आर्थिक सुरक्षा सहकार्य
August 29th, 08:12 pm
भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी, आपल्या सामायिक मूल्ये आणि परस्पर सन्मानावर आधारित असून दोन्ही देशांची सुरक्षा आणि समृद्धी पुढे नेण्यासाठी महत्वाची आहे. आर्थिक सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य हा आमचा धोरणात्मक दृष्टीकोन आणि आर्थिक अनिवार्यतेमधील वाढत्या अभिसरणातून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.भारत आणि जपान यांच्यामधला सुरक्षा सहकार्याविषयक संयुक्त जाहीरनामा
August 29th, 07:43 pm
भारत आणि जपान सरकार (यानंतर यांचा उल्लेख ‘दोन/दोन्ही पक्ष’ असा केला जाईल )आगामी दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन: विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी आठ दिशानिर्देश
August 29th, 07:11 pm
भारत आणि जपान; मुक्त, खुला, शांत, समृद्ध आणि दडपशाहीमुक्त हिंद-प्रशांत प्रदेशाचा कायद्याच्या नियमांवर आधारित समान दृष्टिकोन असलेले दोन देश, पूरक संसाधन देणग्या, तांत्रिक क्षमता आणि किफायतशीर स्पर्धात्मकता असलेल्या दोन अर्थव्यवस्था तसेच मैत्री आणि परस्पर सद्भावनेची दीर्घ परंपरा असलेली दोन राष्ट्रे म्हणून पुढील दशकात आपल्या देशांमध्ये आणि जगात मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी एकत्रितपणे वहन करण्याचा, आपली संबंधित देशांतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याचा तसेच आपल्या देशांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्याचा आपला हेतू याद्वारे व्यक्त करीत आहेत.15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी
August 29th, 07:06 pm
जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.भारत - जपान मानव संसाधन देवाणघेवाण आणि सहकार्य कृती आराखडा
August 29th, 06:54 pm
भारत आणि जपान यांच्या दरम्यान होत असलेल्या व्दिपक्षीय कार्यक्रमामध्ये 5 वर्षात 500,000 कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण होईल. यामध्ये भारतातील 50,000 कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभावंतांचा समावेश असणार आहे. भारत-जपान यांच्यामधील 2025 च्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान उभय देशांच्या पंतप्रधानांनी भेटी आणि देवाणघेवाणीद्वारे त्यांच्या नागरिकांमध्ये सखोल समज वाढवण्याची, मूल्ये सह-निर्माण करण्याची आणि संबंधित राष्ट्रीय प्राधान्यक्रम लक्षात घेवून कार्य करण्यासाठ, मानवी संसाधनांसाठी सहयोगी मार्ग शोधण्याच्या आवश्यकतेविषयी सहमती दर्शविली.फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधानांचा जपान दौरा
August 29th, 06:23 pm
• आर्थिक भागीदारी, आर्थिक सुरक्षा, गतिशीलता, पर्यावरणीय शाश्वतता, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, आरोग्य, व्यक्ती -व्यक्ती आणि राज्य-प्रांत सहभाग या आठ प्रयत्नरेषांमध्ये आर्थिक आणि कार्यात्मक सहकार्यासाठी 10 वर्षांचे धोरणात्मक प्राधान्यजपानमधील सुप्रसिद्ध शोरिन्झान दारुमा-जी मंदिराचे प्रमुख पुजारी सेशी हिरोसे यांच्याकडून पंतप्रधानांना दारुमा बाहुली भेट
August 29th, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज जपानमधील सुप्रसिद्ध ताकासाकी-गुन्मा येथील शोरिन्झान दारुमा-जी मंदिराचे प्रमुख पुजारी सेशी हिरोसे यांनी दारुमा बाहुली भेट दिली. या विशेष भेटीमुळे भारत आणि जपानमधील घनिष्ठ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत .जपानच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना निवेदन
August 29th, 03:59 pm
आज आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीत एका नवीन आणि सोनेरी अध्यायाचा मजबूत पाया रचला आहे. आम्ही आगामी दशकासाठी एक रूपरेषा आखली आहे. आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी गुंतवणूक, नवोन्मेष, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, लोकांमधील आदानप्रदान आणि राज्य-प्रादेशिक भागीदारी या प्रमुख बाबी आहेत. आम्ही आगामी दहा वर्षांमध्ये जपानमधून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत आणि जपानमधील लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान मोदींचे जपानमध्ये टोकियो येथे आगमन
August 29th, 06:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच जपानमध्ये दाखल झाले. जपानमध्ये पंतप्रधान 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेतील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.पंतप्रधानांची ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर बैठक
May 21st, 09:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष महामहीम लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची 21 मे 2023 रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली.Prime Minister’s visit to the Hiroshima Peace Memorial Museum
May 21st, 07:58 am
Prime Minister Shri Narendra Modi joined other leaders at G-7 Summit in Hiroshima to visit the Peace Memorial Museum. Prime Minister signed the visitor’s book in the Museum. The leaders also paid floral tributes at the Cenotaph for the victims of the Atomic Bomb.जपानच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 20th, 08:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्यासमवेत 20 मे 2023 रोजी द्विपक्षीय बैठक घेतली.पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे केले अनावरण
May 20th, 08:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.PM Modi arrives in Hiroshima, Japan
May 19th, 05:23 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Hiroshima, Japan. He will attend the G7 Summit as well hold bilateral meetings with PM Kishida of Japan and other world leaders.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान उपस्थित
September 27th, 04:34 pm
टोक्यो येथील निप्पॉन बुडोकान येथे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना 20 हून अधिक देश /सरकारांच्या प्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.