पंतप्रधानांची याद वाशेम- जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट

February 26th, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत आज जेरुसलेममधील याद वाशेम - या जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट देऊन अशा छळछावण्यांमध्ये बळी गेलेल्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान हॉल ऑफ रिमेम्बरन्स येथे आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. कॅन्टरच्या एल मलेह रहमीम चे भावपूर्ण गायन हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग ठरला. पंतप्रधानांनी होलोकॉस्टमधील बळींच्या वैयक्तिक कहाण्या सादर करणाऱ्या बुक ऑफ नेम्स हॉललाही भेट दिली.

पंतप्रधानांनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट

February 26th, 09:00 pm

यावेळी पंतप्रधानांनी 2017 मधील आपला इस्रायल दौरा आणि 2023 मधील दुबई दौऱ्याच्या वेळी राष्ट्रपती हर्झोग यांच्यासोबत झालेल्या मागील भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. भारत - इस्रायलमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले असून, ते आता शांतता, नवोन्मेष आणि समृद्धीसाठी विशेष धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहोचले असून, ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांची एक नवी सुरुवात असल्याची दखलपूर्ण नोंद दोन्ही नेत्यांनी या भेटीत घेतली. यातून दोन्ही देशांमधील दृढ विश्वास, सामायिक लोकशाही मूल्ये आणि विशेष मैत्रीचे प्रतिबिंबही उमटत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापार आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उपक्रम, संरक्षण आणि सुरक्षा, तसेच दहशतवादविरोधातील लढा या क्षेत्रांमधील विद्यमान सहकार्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली

February 26th, 08:56 pm

इस्रायलच्या राजकीय भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी अधिकृत चर्चा केली.

India - Israel Joint Statement

February 26th, 07:44 pm

At the invitation of Israeli PM Benjamin Netanyahu, PM Modi paid a state visit to Israel from 25 to 26 February 2026. The two leaders noted the immense progress made in the India-Israel bilateral relationship across perse domains. They agreed to elevate the Strategic Partnership to a new level – ‘A Special Strategic Partnership for Peace, Innovation & Prosperity.’

फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधानांचा इस्रायल दौरा

February 26th, 07:41 pm

भू-भौतिकीय उत्खनन क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

India-Israel partnership has stood the test of time: PM Modi at the India-Israel Joint Press Meet

February 26th, 03:30 pm

In his remarks during the India-Israel Joint Press Meet, PM Modi expressed his happiness at visiting Israel. He highlighted the historic decision to elevate the India-Israel time-tested partnership to a Special Strategic Partnership. He noted that discussions were held on giving new direction and greater momentum to cooperation across sectors between the two countries. The PM reiterated his firm commitment against terrorism and welcomed the Gaza Peace Plan.

पंतप्रधानांनी जेरुसलेम येथील तंत्रज्ञान प्रदर्शनाला दिली भेट

February 26th, 10:37 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह विविध क्षेत्रांमधील अग्रगण्य इस्रायली नवोपक्रमांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, हवामान-तंत्रज्ञान, आरोग्य-बायोटेक, स्मार्ट मोबिलिटी, एआय, सायबरसुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानात विशेष कार्य करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संशोधन संस्थांचा समावेश होता.

नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन

February 25th, 08:20 pm

या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.

पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित

February 25th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

पंतप्रधान मोदींचे इस्रायलमधील तेल अवीव येथे आगमन झाले

February 25th, 04:43 pm

पंतप्रधान मोदींचे थोड्या वेळापूर्वी इस्रायलमध्ये आगमन झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान 25-26 फेब्रुवारी 2026 दरम्यान इस्रायलच्या शासकीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि विमानतळावर त्यांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.

इस्रायल दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

February 25th, 08:28 am

माझे प्रिय मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निमंत्रणावरून, मी 25-26 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला शासकीय भेट देणार आहे.

सोशल मीडिया कॉर्नर 6 जुलै 2017

July 06th, 09:00 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधान मोदी यांनी, इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सहअध्यक्षतेत सीईओ फोरमची पहिली बैठक घेतली

July 06th, 07:30 pm

पंतप्रधान मोदी यांनी, इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या सहअध्यक्षतेत तेल अवीव इथे सीईओ फोरमची पहिली बैठक घेतली. व्यापारसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत – इस्रायल भागीदारीचा नवीन अध्याय सुरु झाला आहे, जो दोन्ही देशांच्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी संधी प्रदान करेल.

पंतप्रधान मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू; भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज

July 06th, 07:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू तेल अवीवमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले. युवावर्गाच्या नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत – इस्रायल इनोवेशन ब्रिज ची सुरुवात केली

पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, समुद्राच्या पाण्याचे अलवणीकरण करणाऱ्या फिरत्या युनिटच्या कामाचे सादरीकरण बघितले

July 06th, 02:36 pm

PM Modi and Israeli PM Netanyahu attended demonstration of a mobile seawater desalination unit. Gal-Mobile is an independent, integrated water purification vehicle, designed to produce high-quality drinking water.

पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, इस्रायलमध्ये हऐफा इथे युद्ध समाधीस्थळाला भेट दिली

July 06th, 02:00 pm

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हाएफा इथे भारतीय युद्ध समाधीस्थळी भेट दिली.दोन्ही नेत्यांनी पहिल्या जागतिक युद्धात (WWI) इस्रायलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मेजर दलपत सिंग यांच्या स्मरणार्थ एका फलकाचे अनावरण केले

पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करार यांची यादी

July 05th, 11:52 pm

पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करार यांची यादी

पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान भारत – इस्रायल संयुक्त वक्तव्य

July 05th, 11:52 pm

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ ते ६ जुलै २०१७ या अवधीत इस्रायलला भेट दिली. भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला दिलेल्या या पहिल्याच भेटीमुळे दोन्ही देशांतील नागरिकांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले आणि द्वीपक्षीय संबंध धोरणात्मक भागिदारीत परावर्तीत झाले.

आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी

July 05th, 10:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.

PM Modi and Israeli PM Netanyahu meet young Moshe

July 05th, 10:12 pm

Prime Minister Modi and Israeli PM Netanyahu met young Moshe, the boy who survived the 26/11 Mumbai terror attack. Shri Modi also met young Moshe's maternal and paternal grandparents and Ms. Sandra Solomon, his nanny.