पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियातील अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर वाहिली आदरांजली
December 17th, 01:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अदिस अबाबा येथील अदवा विजय स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. हे स्मारक 1896 च्या अदवाच्या लढाईत आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर इथिओपियन सैनिकांना समर्पित आहे. हे स्मारक अदवाच्या नायकांच्या अमर आत्म्याला आदरांजली असून ते इथिओपियाच्या स्वातंत्र्य, सन्मान आणि जिद्दीच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडवते.इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 17th, 12:25 pm
आज आपल्या समोर उभे राहण्याचा मला मोठा सन्मान आणि विशेषाधिकार लाभला आहे. सिंहांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथिओपियात येणे हे अत्यंत आनंददायी आहे. मला येथे अगदी घरी असल्यासारखे वाटते कारण, भारतातील माझे गृह राज्य गुजरात हेही सिंहांचे निवासस्थान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
December 17th, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
December 17th, 09:25 am
इथियोपियाच्या या महान भूमीवर आज तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित असणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आत्ता दुपारीच मी इथियोपियात पोहोचलो आहे आणि आल्या क्षणापासूनच मला लोकांकडून आपुलकीची आणि जवळकीची भावना जाणवते आहे. पंतप्रधान स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी उपस्थित होते आणि ते मला फ्रेंडशिप पार्क आणि विज्ञान संग्रहालयात घेऊन गेले.इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांच्यासोबत प्रतिनिधीस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 17th, 09:12 am
इथियोपियाला भेट देत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. इथियोपियाची ही माझी पहिलीच भेट आहे. मात्र येथे पाऊल टाकताच आपुलकीची आणि आत्मीयतेची तीव्र अनुभूती मला मिळाली. भारत आणि इथियोपिया यांच्यात हजारो वर्षांपासून सातत्याने संपर्क, संवाद आणि आदान-प्रदान होत आले आहे. अनेक भाषा आणि समृद्ध परंपरांनी संपन्न असलेले आपले दोन्ही देश ‘विविधतेत एकता’चे प्रतीक आहेत. दोन्ही देश शांतता आणि मानव कल्याणासाठी कटिबद्ध लोकशाही शक्ती आहेत. आपण ग्लोबल साउथचे सहप्रवासीही आहोत आणि भागीदारही आहोत. आंतरराष्ट्रीय मंचांवरही आपण खांद्याला खांदा लावून उभे राहिलो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
December 17th, 12:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांची आज आदिस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये भेट घेतली. पॅलेसमध्ये आगमनावेळी पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला.पंतप्रधानांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
December 16th, 11:52 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 16-17 डिसेंबर 2025 दरम्यान इथिओपियाला आपला द्विपक्षीय दौरा करत आहेत. आज एडिस आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष समारंभात, इथिओपियाचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांनी भारत-इथिओपिया भागीदारी बळकट करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल आणि जागतिक स्तरावरील राजकारणी म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाच्या सन्मान करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया' प्रदान केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इथिओपियामध्ये स्नेहमय स्वागत
December 16th, 06:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या इथिओपियाच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर अदिस अबाबा येथे पोहोचले. विमानतळावर आगमन झाल्यावर इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे स्नेहपूर्ण आणि रंगतदार स्वागत करण्यात आले.