पंतप्रधानांनी जी- 7 शिखर परिषदेदरम्यान युरोपियन परिषदेच्या अध्यक्षांशी साधला संवाद

June 18th, 05:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी - 7 शिखर परिषदेदरम्यान फलदायी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम ली जे-म्युंग यांची G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट

June 18th, 03:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे 51 व्या जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांची भेट घेतली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.

जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद

June 18th, 03:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी सार्थक आणि मनापासून संवाद साधला. त्यांनी ग्लोबल साऊथचे सक्रिय समर्थन करण्याप्रति भारताच्या अतूट वचनबद्धतेला दुजोरा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांशी साधला संवाद

June 18th, 03:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या जी -7 शिखर परिषदेदरम्यान युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष, उर्सुला वॉन डर लायेन यांच्यासोबत फलदायी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेत जपानच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

June 18th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या 51 व्या जी -7 शिखर परिषदेमध्ये जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट

June 18th, 02:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या 51 व्या जी- 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान, महामहिम जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भारत आणि इटली यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत राहील, आणि याचा मोठा लाभ आपल्या नागरिकांना मिळत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद

June 18th, 02:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांबाबत विचारांचे आदानप्रदान करत, उभय नेत्यांनी भारत आणि फ्रान्स आपल्या वसुंधरेच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील यावर भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

June 18th, 02:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस इथे झालेल्या 51 व्या जी-7 शिखर परिषदे दरम्यान युनायटेड किंगडमचे पंतप्रधान,केर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला. भारत आणि युनायटेड किंगडममधील संबंध अधिक दृढ होत आहेत, यातून व्यापार आणि वाणिज्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीची प्रचिती येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.

जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद

June 18th, 02:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची घेतली भेट

June 18th, 02:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी भेट घेतली.

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी संभाषणाबाबत परराष्ट्र सचिवांचे निवेदन

June 18th, 12:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट होणार होती.मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लवकर अमेरिकेला परतावे लागले,त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.

जी-7 राष्ट्र समुहाच्या उर्जा सुरक्षेवरील संवाद सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17 जून 2025)

June 18th, 11:15 am

जी-7 शिखर परिषदेकरता आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आणि उत्तम स्वागतासाठी मी पंतप्रधान कार्नी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. जी-7 समुहाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मी सर्व मित्रांचे मनापासून अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी जी-7 आउटरीच सत्राला केले संबोधित

June 18th, 11:13 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाच्या कनानास्किस येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या आऊटरीच सत्रात सहभाग घेतला.‘ऊर्जा सुरक्षितता: बदलत्या जागतिक परिस्थितीत उपलब्धता व परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविधता,तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा’ या विषयावरील सत्राला त्यांनी संबोधित केले. दरम्यान, जी-7 च्या 50 वर्षांच्या प्रवासाबद्दलही त्यांनी अभिनंदन केले आणि आमंत्रण दिल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे आभार मानले.

जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट

June 18th, 08:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अल्बर्टामधील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली

जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट

June 17th, 11:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. मे 2025 मध्ये चॅन्सलर मर्झ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधे झालेली ही पहिलीच भेट होती.निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल आणि पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी चॅन्सलर मर्झ यांचे अभिनंदन केले.अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबद्दल जर्मन सरकारने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनांबद्दल पंतप्रधानांनी मनापासून आभार व्यक्त केले.

जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

June 17th, 11:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष डॉ. क्लाउडिया शेनबाउम पार्डो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.पंतप्रधानांनी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांचे त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले.