पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट

July 09th, 06:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला.

संयुक्त निवेदन: भारत आणि ब्राझील - उच्च उद्देश असलेली दोन महान राष्ट्रे

July 09th, 05:55 am

ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जुलै 2025 रोजी ब्राझील दिली. मैत्री आणि विश्वास हा जवळपास आठ दशकांपासून ब्राझील-भारत संबंधांचा पाया राहिला आहे. 2006 मध्ये हे संबंध धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाले.

पंतप्रधानांचा ब्राझील दौरा: फलश्रुति

July 09th, 03:14 am

आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधात सहकार्य करार

ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" पंतप्रधानांना प्रदान

July 09th, 12:58 am

ब्राझीलचे राष्ट्रपती, महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस प्रदान केला.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनाचा मराठी मजकूर

July 08th, 08:30 pm

रिओ आणि ब्राझिलियामध्ये अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. अमेझॉनच्या सौंदर्याने आणि तुमच्या सह्रदयतेने आम्ही खरोखरच प्रभावित झालो आहोत.

पंतप्रधान मोदींचे ब्राझीलमधील ब्राझिलिया येथे आगमन

July 08th, 02:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थोड्याच वेळापूर्वी अधिकृत सरकारी भेटीसाठी ब्राझिलिया येथे आगमन झाले. ते राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याशी भारत-ब्राझील संबंधांच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करतील.

ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरो येथील ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

July 07th, 05:19 am

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्युबाचे अध्यक्ष महामहिम मिगुएल डियाझ-कॅनेल बर्मुडेझ यांची भेट घेतली. यापूर्वी 2023 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष डियाझ-कॅनेल यांची पंतप्रधानांनी भेट घेतली होती, ज्यावेळी क्युबा विशेष आमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित होता.

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मलेशियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट

July 07th, 05:13 am

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो मध्ये 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान महामहिम अन्वर बिन इब्राहिम यांची भेट घेतली.

ब्राझीलमधील भारतीयांनी केलेल्या ह्रदय स्वागताबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक

July 06th, 08:28 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ दि जानेरो येथे त्यांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, हे पाहून आश्चर्य वाटते की ते भारतीय संस्कृतीशी किती घट्ट जोडलेले आहेत आणि भारताच्या प्रगतीबाबत किती उत्कटतेने कार्यरत आहेत.

पंतप्रधान मोदींचे ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरो येथे आगमन

July 06th, 04:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही वेळापूर्वी ब्राझीलमध्ये आगमन झाले. ते रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहणार असून तिथे अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतील.