रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
September 01st, 01:24 pm
आपल्याला भेटून अत्यंत आनंद झाला. आपली भेट हा एक संस्मरणीय क्षण असतो असे मला नेहमी वाटत आले आहे. या भेटीत अनेक गोष्टींच्या माहितीचे परस्परांमध्ये देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते.पंतप्रधानांनी घेतली रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भेट
September 01st, 01:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली.रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणणण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
September 01st, 12:48 pm
चीनमधील तिआनजिन येथे आयोजित SCO शिखर परिषदेच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, यावेळी झालेल्या चर्चेत युक्रेन संघर्ष हा विषय केंद्रस्थानी होता. शांततेच्या दृष्टीने अलीकडे सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी स्वागत करत सर्व बाजू रचनात्मकरीत्या पुढे येतील अशी आशाही व्यक्त केली. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची तसेच कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय शोधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मोठ्या प्रमाणात मानवी पैलूवर भर देऊन हा केवळ प्रादेशिक मुद्दा नसून मानवतेने दिलेली हाक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.25 व्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 01st, 10:14 am
25 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी राष्ट्रपती शी यांचे मनापासून आभार मानतो.चीनमधील तियानजिन येथील पंचविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 01st, 10:00 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभाग झाले आहेत. या शिखर परिषदेत एससीओचे विकासविषयक धोरण, जागतिक प्रशासनात करण्याच्या सुधारणा, दहशतवाद विरोधी धोरण, शांतता आणि सुरक्षा, आर्थिक आणि वित्तीय सहकार्य आणि शाश्वत विकास यावर सफल चर्चा झाली.शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी म्यानमारच्या राष्ट्र सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन ऑन्ग हलिंग यांची घेतली भेट
August 31st, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष सिनियर जनरल मिन आंग हलिंग यांची भेट घेतली. भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट', 'ॲक्ट ईस्ट' आणि 'इंडो-पॅसिफिक' धोरणांचा एक भाग म्हणून म्यानमारसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत,असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, संरक्षण आणि सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि सीमा व्यापार यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक पैलूंवर आणखी प्रगती करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या संपर्कव्यवस्था प्रकल्पांमधील प्रगतीमुळे दोन्ही देशांच्या लोकांमध्ये अधिक संवाद वाढेल, तसेच भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणात संकल्पना केलेल्या प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.India - China cooperation is linked to the interests of 2.8 billion people: PM Modi in Tianjin
August 31st, 11:06 am
In his remarks, PM Modi thanked Chinese President Xi Jinping for the warm welcome. Recalling their meaningful discussions in Kazan, the PM noted that an atmosphere of peace and stability has been established following the border disengagement. He further highlighted the resumption of the Kailash Mansarovar Yatra and congratulated the President on China’s successful presidency of the SCO.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा
August 31st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट 2025 रोजी तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) च्या नेत्यांच्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये तिआनजीन येथे आगमन
August 30th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच चीनमध्ये दाखल झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हा दौरा करत आहेत. तियानजिन येथील शिखर परिषद होत असताना ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.शांघाय सहकार्य संघटनेच्या 2022 शिखर परिषदेत पहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून वाराणसीचे झाले नामांकन
September 16th, 11:50 pm
उझबेकिस्तानात समरकंद इथे 16 सप्टेंबर 2022 रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्र प्रमुखांच्या 22 व्या बैठकीत वाराणसी शहराचे 2022-2023 या कालावधीकरीता पहिली-वहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून नामांकन करण्यात आले आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांच्याशी झाली बैठक
September 16th, 11:41 pm
शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने उझबेकीस्तानात समरकंद इथे काल 16 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांची भेट झाली.एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचे समरकंद येथे आगमन
September 15th, 10:01 pm
उझबेकिस्तानचे राष्ट्रपती महामहीम शौकत मिर्झीयोयेव्ह यांनी दिलेल्या आमंत्रणावरून, एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्ष मंडळाच्या 22 व्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आगमन झाले.उझबेकिस्तानच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
September 15th, 02:15 pm
उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिरझीयोयेव यांच्या निमंत्रणावरून मी, शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंदला भेट देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे झाले सहभागी
September 17th, 05:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या एससीओ- सीएसटीओ संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.अफगाणिस्तानवरील एससीओ-सीएसटीओ जनसंपर्क शिखर परिषदेमधील पंतप्रधानांचे भाषण
September 17th, 05:01 pm
अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर शांघाय सहकार्य संघटना आणि सामूहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात विशेष बैठक आयोजित केल्याबद्दल मी अध्यक्ष रहमोन यांचे आभार मानतो.21st Meeting of SCO Council of Heads of State in Dushanbe, Tajikistan
September 15th, 01:00 pm
PM Narendra Modi will address the plenary session of the Summit via video-link on 17th September 2021. This is the first SCO Summit being held in a hybrid format and the fourth Summit that India will participate as a full-fledged member of SCO.