PM greets the people of Mizoram on the occasion of their Statehood Day
February 20th, 09:33 am
Prime Ministed Shri Narendra Modi greeted the people of Mizoram on the occasion of their Statehood Day today.स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
December 04th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वराज कौशल यांनी विधिज्ञ म्हणून स्वतःची उल्लेखनीय ओळख निर्माण केली आणि वंचित- दुर्बलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कायद्याच्या व्यवसायाचा उपयोग करण्यावर त्यांनी सदैव भर दिला, असे मोदी म्हणाले. कौशल हे भारताचे सर्वांत तरुण राज्यपाल झाले आणि त्यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात मिझोरममधील जनतेवर त्यांनी अमिट छाप सोडली, असे मोदी पुढे म्हणाले. एक खासदार म्हणून त्यांचे विचार आणि मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वपूर्ण होते.अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 22nd, 11:36 am
हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
September 22nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी डोनयी पोलो यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे सर्वांना आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली.मिझोराममध्ये विकासकार्यांची पायाभरणी आणि उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 13th, 10:30 am
मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह जी, मुख्यमंत्री श्री लालदुहोमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अश्विनी वैष्णव जी, मिझोराम सरकारमधले मंत्रिगण, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी, मिझोरामच्या शानदार जनतेला शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 13th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
September 12th, 02:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मिझोरामला भेट देतील आणि सकाळी 10 वाजता आयजॉल येथे पंतप्रधान 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील.मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 14th, 04:48 pm
मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 23rd, 11:00 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन
May 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
February 20th, 04:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले.मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.मिझोरमच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
January 21st, 12:54 pm
मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
October 26th, 01:45 pm
मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.
July 06th, 01:25 pm
मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मिझोराम राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
February 20th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मिझोरामच्या निरंतर प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.सेंद्रीय पद्धतीने शेती करणाऱ्या मिझोराम येथील शेतकऱ्याने आपले उत्पन्न सात पटीने वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
January 08th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेतील देशभरातील हजारो लाभार्थ्यांनी केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार आणि स्थानिक लोक प्रतिनिधींसमवेत या कार्यक्रमात भाग घेतला.मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
January 04th, 02:30 pm
मिझोरामचे मुख्यमंत्री पु. लालदुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.‘Modi Ki Guarantee’ vehicle is now reaching all parts of the country: PM Modi
December 16th, 08:08 pm
PM Modi interacted and addressed the beneficiaries of the Viksit Bharat Sankalp Yatra via video conferencing. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for getting the opportunity to flag off the Viksit Bharat Sankalp Yatra in the five states of Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana and Mizoram, and remarked that the ‘Modi Ki Guarantee’ vehicle is now reaching all parts of the country