संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करारा'ला सूचित करण्यात येणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाला (2031-2035) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
March 25th, 05:35 pm
हवामान बदलाशी संबंधित भारताची कृती अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2031 ते 2035 या कालावधीसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानाला (एनडीसी) मान्यता दिली आहे. याद्वारे यूएनएफसीसीसी आणि त्याअंतर्गत झालेल्या पॅरिस कराराच्या संदर्भात देशाची महत्त्वाकांक्षा उंचावण्यात आली असून, शाश्वत विकास आणि हवामान न्यायाप्रति भारताची वचनबद्धता अधिक दृढ करण्यात आली आहे.पंतप्रधान 1 मार्च रोजी तामिळनाडू आणि पुदुचेरीला भेट देणार
February 27th, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मार्च 2026 रोजी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला भेट देणार आहेत. राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9 च्या सुमाराला चेन्नईला पोहोचतील.