कर्नाटक, तेलंगण, बिहार आणि आसाम या राज्यांना लाभदायक असलेल्या तीन प्रकल्पांच्या बहु-मार्गीकरणाला तसेच गुजरातमधील कच्छच्या दुर्गम भागांना जोडणाऱ्या एका नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता

August 27th, 04:50 pm

हे प्रकल्प प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ आणि जलद करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या उपक्रमांमुळे संपर्क व्यवस्था वाढेल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल, शिवाय लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. याव्यतिरिक्त, हे प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावतील, ज्यामुळे शाश्वत आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीस चालना मिळेल. या प्रकल्पांमुळे बांधकामाच्या कालावधीत सुमारे 251 लाख मानवी दिवसांसाठी थेट रोजगार निर्माण होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाची 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा आणि झारखंड या राज्यांमधील 13 जिल्ह्यांचा समावेश; भारतीय रेल्वेचे जाळेही सुमारे 574 किमीने विस्तारणार

July 31st, 03:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी सुमारे 11,169 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. हे प्रकल्प खाली नमूद केले आहेत:

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

June 11th, 03:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,405 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे:-

केंद्रीय मंत्रिमंडळाने 6,798 कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

October 24th, 03:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,798 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

वाराणसी - पंडित दीनदयाळ उपाध्याय (DDU) जंक्शन रेल्वे मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारण्यासह, गंगा नदीवरील नवीन रेल्वे तसेच रस्ते मार्ग पूल (rail-cum-road bridge) उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 16th, 03:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित 2,642 कोटी रुपये (अंदाजे) इतक्या एकूण अंदाजित खर्चाच्या एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आज मंजुरी दिलेला प्रस्तावित प्रकल्प बहुपदरी - मार्गिकांविषयीचा (multi - tracking) असून, या प्रकल्पामुळे रेल्वेचे परिचालन सुलभ होणार असून, त्यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होऊ शकणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या विभागांमधील आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांतर्गत राबवला जाणार आहे.

मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला दिली मंजुरी

September 02nd, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 18,036 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल आणि प्रवासाची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून आखण्यात आला आहे, जो या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवेल आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला दिली मंजुरी

August 09th, 09:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 18,036 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल आणि प्रवासाची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून आखण्यात आला आहे, जो या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवेल आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्या अंतर्गत, विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे करणार वितरण

February 11th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरण करणार आहेत.

रोजगार मेळ्याअंतर्गत, पंतप्रधान 28 ऑक्टोबर रोजी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या 51,000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार

October 27th, 03:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000 हून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. पंतप्रधान यावेळी या उमेदवारांना संबोधितही करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण

August 06th, 11:30 am

देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

August 06th, 11:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.

रत्नीपोरासाठी रेल मार्गाने संपर्क सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले स्वागत

May 11th, 06:14 pm

अवंतीपोरा आणि काकापोरा दरम्यान असलेल्या रत्नीपोरा थांब्याची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असल्याचे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे. रेल मार्गावर या थांब्यामुळे या प्रदेशात वाहतूक सुलभ,सुगम करणार आहे.

भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन

April 01st, 03:51 pm

इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

April 01st, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 39 वी प्रगती बैठक

November 24th, 07:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी -मोडल मंचाची 39 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगतीची’ 37 वी आढावा बैठक

August 25th, 07:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती- म्हणजेच – आयसीटी आधारित पुढाकार घेऊन कार्यरत प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयीचा बहु-पर्यायी प्लॅटफॉर्म-PRAGATI अंतर्गत कामांचा आढावा घेतला.

जगातील सर्वाधिक उंचीच्या रेल्वे पुलावरील कमानीचे बांधकाम पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार

April 05th, 08:51 pm

जम्मू कश्मीरमध्ये भारतीय रेल्वेकडून उभारल्या जात असलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब पुलावरील कमानीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकोद्गार काढले आहेत.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 35 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न

January 27th, 08:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 35 वे सत्र संपन्न झाले. प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आयसीटी आधारित बहुस्तरीय व्यासपीठ, यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश असतो.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद

December 30th, 07:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ची 34 वी बैठक आज झाली. या बैठकीमध्ये विविध प्रकल्प, कार्यक्रम आणि तक्रारी यांचा आढावा घेण्यात आला.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ची 33 वी बैठक संपन्न

November 25th, 08:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रो-ॲक्टिव्ह गर्व्हनन्स अँड टाइमली इम्लिमेंटेशन’- पीआरएजीएटीआय म्हणजेच ‘प्रगती’च्या 33 वी बैठक झाली. यामध्ये ‘आयसीटी’ अर्थात माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या बहु-स्तरीय मंचाव्दारे केंद्र आणि राज्य सरकार यांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन संवाद साधतात.