पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय विभागीय जल शिखर परिषदेचे समारोप सत्र संपन्न
September 02nd, 09:00 pm
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय विभागीय जल शिखर परिषदेचे समारोप सत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.केंद्रीय मंत्रीमंडळाची जल जीवन मिशनला (जेजेएम) डिसेंबर 2028 पर्यंत अतिरिक्त खर्चासह मुदतवाढ तसेच जेजेएम 2.0 अंतर्गत ग्रामीण पेयजल पुरवठा क्षेत्रामधील रचनात्मक सुधारणांवर भर देणाऱ्या पुनर्रचित अंमलबजावणीला मान्यता
March 10th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने आज जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीची पुनर्रचना तसेच सेवा वितरणाच्या दिशेने वळवण्यास मंजूरी दिली. पेयजल प्रशासन व संस्थाप्रणालीच्या पाठिंब्याद्वारे नळाद्वारे शाश्वत ग्रामीण पेयजल पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती ते पुरवठा असे हे अभियान आहे.