Cabinet approves alteration of the name of the State of “Kerala” to “Keralam”
February 24th, 03:20 pm
The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the proposal to alter the name of the State of Kerala to ‘Keralam’. The President of India will now refer the Kerala (Alteration of Name) Bill, 2026 to the Kerala Legislative Assembly for expressing its views under the proviso to Article 3 of the Constitution of India. Earlier, on 24 June 2024, the Kerala Legislative Assembly had passed a resolution seeking the name change.रोजगार मेळावा अंतर्गत पंतप्रधान 24 जानेवारी रोजी नवनियुक्त 61,000 हून जास्त युवकांना नियुक्ती पत्रे करणार वितरित
January 23rd, 05:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 61,000 हून अधिक तरुणांना 18 व्या रोजगार मेळ्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या जवानांना शुभेच्छा
December 20th, 11:29 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त संस्थेशी संबंधित सर्व जवानांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान 6 ऑगस्ट रोजी कर्तव्य भवनचे करणार उद्घाटन
August 04th, 05:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12:15 च्या सुमारास दिल्लीतील कर्तव्य पथ येथील कर्तव्य भवनला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर, पंतप्रधान संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता कर्तव्य पथावर जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक
May 08th, 02:17 pm
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक पार पडली.तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या समर्पणाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 03rd, 12:15 pm
चंदीगडमध्ये आलो की मला माझ्याच लोकांमध्ये आल्यासारखे वाटते. चंदीगडची ओळख शक्तीस्वरूपा माँ चंडिका देवीच्या नावाशी जोडलेली आहे. माँ चंडी म्हणजे शक्तीचे असे स्वरूप, जे सत्य आणि न्यायाची पाठराखण करते. हीच भावना भारतीय न्याय संहिता आणि नागरी सुरक्षा संहितेच्या संपूर्ण मसुद्याचा पाया आहे. आज देश विकसित भारताच्या संकल्पासह आगेकूच करतो आहे संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत... अशा वेळी संविधानाच्या भावनेने प्रेरित भारतीय न्यायिक संहितेची अंमलबजावणी होते आहे, ही एक मोठी सुरुवात आहे. आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी कल्पना केलेल्या आदर्शांची पूर्तता करण्याच्या दिशेने हा एक ठाम प्रयत्न आहे. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होईल, याचे प्रात्यक्षिक अर्थात लाईव्ह डेमो मी आता पाहत होतो. आणि मी इथल्या प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी वेळ काढून हा लाईव्ह डेमो पाहावा. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी पहावे, बार मधील सहकाऱ्यांनी पहावे, न्यायपालिकेच्या मित्रांना शक्य असले, तर त्यांनीही पहावे. या निमित्ताने मी सर्व देशवासियांना भारतीय न्याय संहिता, नागरी संहिता लागू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि चंदीगड प्रशासनाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचे लोकार्पण
December 03rd, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड येथे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनकारी नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी देशाला समर्पित केली. उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी चंडीगढची ओळख सत्य आणि न्याय प्रस्थापित करणारी शक्ती माँ चंडी देवीशी निगडित असल्याचे नमूद केले . हेच तत्त्वज्ञान भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या संपूर्ण स्वरूपाचा आधार असल्याचे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेच्या भावनेने प्रेरित भारतीय न्याय संहिता अंमलात आणणे हा एक गौरवशाली क्षण होता कारण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे मार्गक्रमण करण्याच्या तसेच भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे साजरी करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होता असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांसाठी ज्या आदर्शांची कल्पना केली , ती पूर्ण करण्याच्या दिशेने हा एक ठोस प्रयत्न आहे. मोदी म्हणाले की या कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची याची झलक त्यांना थेट प्रात्यक्षिकातून पहायला मिळाली. पंतप्रधानांनी लोकांना कायद्यांचा हा लाईव्ह डेमो पाहण्याचे आवाहन केले. तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. चंदीगड प्रशासनातील सर्व संबंधितांचेही त्यांनी अभिनंदन केले.पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित
November 29th, 09:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.PM reviews preparedness for cyclone “Remal”
May 26th, 09:20 pm
Prime Minister Shri Narendra Modi chaired a meeting to review the preparedness for cyclone “Remal” over North Bay of Bengal at his residence at 7, Lok Kalyan Marg earlier today.रोजगार मेळ्याअंतर्गत, पंतप्रधान 28 ऑक्टोबर रोजी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या 51,000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार
October 27th, 03:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000 हून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. पंतप्रधान यावेळी या उमेदवारांना संबोधितही करतील.केंद्रीय मंत्रीमंडळाची सीटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन 2.0 (CITIIS 2.0) योजनेला 2023 ते 2027 या कालावधीसाठी मंजूरी
May 31st, 09:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सीटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेट, इंटिग्रेट आणि सस्टेन 2.0 (सीटीज 2.0) या योजनेला मान्यता दिली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD), Kreditanstalt für Wiederaufbau (KfW), युरोपियन युनियन (EU), आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) यांच्या भागीदारीतून सीटीज 2.0 ही योजना तयार केली आहे. हा उपक्रम चार वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2023 ते 2027 पर्यंत राबवला जाणार आहे.“तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली उच्च स्तरीय आढावा बैठक
May 15th, 06:54 pm
ज्या राज्यांमध्ये “तौ ते” चक्रीवादळामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा राज्यांच्या सरकारांनी आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयांनी/संस्थांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उच्च स्तरीय बैठक घेतली.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न
February 24th, 07:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले.PM reviews Vishakhapatnam Gas Leak Incident
May 07th, 06:35 pm
PM Modi chaired a high-level meeting to take stock of the steps being taken in response to the Vishakhapatnam gas leak incident. He discussed at length the measures being taken for the safety of the affected people as well as for securing the site affected by the disaster.Cabinet Secretary reviews the preventive measures on “Novel Coronavirus” outbreak
January 27th, 07:32 pm
Cabinet Secretary today (27.1.2020) reviewed the situation arising out of “Novel Coronavirus” outbreak in China.केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
October 31st, 02:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे उद्घाटन केले.देशाच्या काही भागांमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनांचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध
March 07th, 10:44 am
देशाच्या काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोरकारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. देशाच्या काही भागांमध्ये पुतळे पाडले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंतप्रधानांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटनांचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्रालयही तोडफोडीच्या या घटनांकडे गांभिर्याने पाहत आहे. राज्यांनी अशा घटना रोखण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलावित असे, निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. अशा घटनांशी सर्व संबंधितांवर योग्य त्या नियमांतर्गत खटले दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.