पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन

October 14th, 01:15 pm

मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सहा वर्षांनंतर भारतात आगमन होणे ही एक विशेष बाब आहे. भारत आणि मंगोलिया आपल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्ष तसेच धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे साजरी करत असताना ही भेट होत आहे. या निमित्ताने आम्ही आमचा सामायिक वारसा, वैविध्य आणि घनिष्ठ नागरी संबंधांचे प्रतीक म्हणून एक संयुक्त टपाल तिकीट जारी केले आहे.

इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

August 23rd, 10:10 pm

येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित

August 23rd, 05:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौरा (02 - 09 जुलै )

June 27th, 10:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 02-03 जुलै 2025 दरम्यान घानाला भेट देतील. पंतप्रधानांचा घानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. तीन दशकांनंतर भारताचे पंतप्रधान घानाला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून मजबूत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य आणि विकास सहकार्य भागीदारीद्वारे ती वाढवण्यासाठी अन्य मार्गांवर चर्चा करतील. हा दौरा दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ECOWAS [पश्चिम आफ्रिकन देशांचा आर्थिक समुदाय] आणि आफ्रिकन संघासोबत भारताचे संबंध मजबूत करण्याप्रति सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.

फलनिष्पत्ती: चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

April 01st, 06:45 pm

अंटार्क्टिका सहकार्याबाबत हेतू पत्र

भारत - चिली संयुक्त निवेदन (01, एप्रिल 2025)

April 01st, 06:11 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, चिलीचे अध्यक्ष, महामहिम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट हे 1-5 एप्रिल 2025 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना यंदा 76 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त ते भारतभेटीवर आहेत. अध्यक्ष बोरिक यांच्यासोबत परराष्ट्र व्यवहार, कृषी, खाणकाम, महिला आणि लिंगभाव समानता आणि संस्कृती, कला आणि वारसा मंत्री, संसद सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक देखील आले आहेत. नवी दिल्ली व्यतिरिक्त, अध्यक्ष बोरिक हे आग्रा, मुंबई आणि बंगळुरूला भेट देतील. अध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अध्यक्ष बोरिक आणि पंतप्रधान मोदी यांची पहिली भेट नोव्हेंबर 2024 मध्ये रिओ डी जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेदरम्यान झाली होती.

उत्कर्ष ओदिशा - मेक इन इंडिया कॉनक्लेव्हमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

January 28th, 11:30 am

जानेवारी महिन्यात, म्हणजे 2025 च्या सुरुवातीलाच माझा ओदिशाचा हा दुसरा दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मी इथे झालेल्या अनिवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आज आता उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्हमध्ये मी तुमच्या सोबत आलो आहे. मला सांगण्यात आले आहे की ओदिशामध्ये आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यवसायविषयक शिखर परिषद आहे. पूर्वीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने अधिक गुंतवणूकदार यात सहभागी होत आहेत. ओदिशाच्या जनतेचे, ओदिशा सरकारचे या अप्रतिम कार्यक्रमासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वरमध्ये केले “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्‌घाटन

January 28th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओदिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओदिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओदिशाची जनता आणि ओदिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनी इथे व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत संबोधन

May 24th, 04:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी इथे ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला संबोधित केले. या बैठकीला, पोलाद, बँकिंग, ऊर्जा, खनिज आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरु देखील या बैठकीला उपस्थित होते.

राजस्थानमधील नाथव्दार येथे विविध विकास कामांची आधारशिला ठेवताना आणि काही प्रकल्पांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 10th, 12:01 pm

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा जी, मुख्यमंत्री, माझे मित्र अशोक गेहलोत जी, विधानसभेचे सभापती सी.पी. जोशी, राज्य सरकारचे मंत्री भजनलाल जाटव, संसदेतील माझे सहकारी आणि राजस्थान भाजपाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश जोशी, संसदेतील माझे सर्व सहकारी, भगिनी दीयाकुमारी, खासदार कनकमल कटारा, खासदार अर्जुनलाल मीना, कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सर्व प्रतिष्ठित आणि राजस्थानचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,

राजस्थानमध्ये नाथद्वारा इथल्या रु. 5500 कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण

May 10th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये नाथद्वारा इथे रु. 5500 कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. हे विकास प्रकल्प या प्रदेशातल्या पायाभूत सुविधा आणि दळणवळ यावर लक्ष केंद्रित करणारे असून, यामधील रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांमुळे वस्तू आणि सेवांची वाहतूक सुलभ होईल. ज्या योगे, या भागातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळेल आणि इथल्या नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

मध्य प्रदेश के इंदौर में मध्य प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स समिट 2023 में प्रधानमंत्री के वीडियो संदेश का मूल पाठ

January 11th, 05:00 pm

मध्य प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेसाठी सर्व गुंतवणूकदार,उद्योजक यांचे खूप-खूप स्वागत ! विकसित भारत घडवण्यामध्ये मध्य प्रदेशाची महत्वाची भूमिका आहे. भक्ती, अध्यात्मापासून ते पर्यटन, कृषी शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत मध्यप्रदेश आगळा,अद्भुत आणि सजगही आहे.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 ला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित

January 11th, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाद्वारे मध्य प्रदेशातील इंदूर येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेत मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या विविध संधींचे दर्शन घडणार आहे.

‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे भाषण

March 03rd, 10:08 am

या अर्थसंकल्पात ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ बाबत जे निर्णय घेतले गेले आहेत, ते आपल्या उद्योग आणि अर्थव्यवस्था, दोन्हीसाठी फार महत्वपूर्ण आहेत. मेक इन इंडिया मोहीम आज 21व्या शतकातील भारताची गरज देखील आहे आणि यामुळे आपल्याला जगात आपले सामर्थ्य दाखविण्याची संधी देखील मिळते. एखाद्या देशातून कच्चा माल बाहेर जातो आणि त्यापासून बनविलेल्या वस्तू आयात करतो, तर त्या देशासाठी हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो.

'मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड' या विषयावर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे मार्गदर्शन

March 03rd, 10:07 am

आज उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन (डीपीआयआयटी) विभागातर्फे आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी संबोधित केलेले हे आठवे अर्थसंकल्पोत्तर वेबिनार आहे. वेबिनारची संकल्पना 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' अर्थात जगासाठी मेक इन इंडीया अशी होती.

मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेच्या प्रारंभावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 13th, 11:55 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री नितीन गडकरीजी, श्री पियुष गोयलजी, श्री हरदीप सिंह पुरीजी, श्री सर्वानंद सोनोवालजी, श्री ज्योतिरादित्य सिंधियाजी, श्री अश्विनी वैष्णवजी, श्री राज कुमार सिंहजी, विविध राज्य सरकारांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, राज्य मंत्रीमंडळातील सदस्य, उद्योग जगतातील सहकारी, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांनी पीएम गतीशक्तीचा प्रारंभ केला

October 13th, 11:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती - राष्ट्रीय महायोजनेचा प्रारंभ केला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील नवीन प्रदर्शन संकुलाचे उद्घाटनही त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, हरदीपसिंग पुरी, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव, आर के सिंह, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, राज्य मंत्री , प्रख्यात उद्योगपती यावेळी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक मलिका श्रीनिवासन, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष टीव्ही नरेंद्रन आणि रिविगोचे सह-संस्थापक दीपक गर्ग यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

भारतीय अंतराळ संघटनेचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

October 11th, 11:19 am

भविष्यासाठीच्या आपल्या योजना, आपल्या कल्पना ऐकून, आपणा सर्वांचा हुरूप बघून माझा उत्साहही द्विगुणीत झाला आहे.

पंतप्रधानांनी भारतीय अवकाश संघटनेची सुरुवात केली

October 11th, 11:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज आयएसपीए अर्थात भारतीय अवकाश संघटनेची औपचारिक सुरुवात केली. याप्रसंगी त्यांनी अंतराळ क्षेत्राशी निगडीत प्रतिनिधींशी संवाद देखील साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी आणि व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील हितसंबंधियांशी संवाद

August 06th, 06:31 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, जगभरात सेवा देत असलेले सर्व राजदूत, उच्चायुक्त, केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व अधिकारी तसेच वेगवेगळी निर्यात मंडळे, वाणिज्य आणि उद्योग संघटनेतील सर्व नेते, महोदय आणि महोदया!