पहिल्या मतदानापासून ते स्टार्टअप इंडियापर्यंत, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केली भारतातील तरुणांचे कौतुक
January 25th, 11:30 am
राष्ट्रीय मतदार दिनी प्रसारित झालेल्या या वर्षीच्या पहिल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. त्यांनी स्टार्टअप्स, जलसंवर्धन, गुणवत्ता, संस्कृती आणि उत्सव आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख विषयांवरही प्रकाश टाकला. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील तज्ञ सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
December 18th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला.उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 11:45 am
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित
November 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन
November 23rd, 12:45 pm
जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
November 23rd, 12:30 pm
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
November 22nd, 09:57 pm
नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
November 22nd, 09:35 pm
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
November 19th, 07:01 pm
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
November 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.Talking to you felt like talking to a family member, not the Prime Minister: Farmers say to PM Modi
October 12th, 06:45 pm
During the interaction with farmers at a Krishi programme in New Delhi, PM Modi enquired about their farming practices. Several farmer welfare initiatives like Government e-Marketplace (GeM) portal, PM-Kisan Samman Nidhi, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, and PM Dhan Dhaanya Krishi Yojana were discussed. Farmers thanked the Prime Minister for these initiatives and expressed their happiness.35,440 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या कृषी योजनांच्या शुभारंभाच्या प्रसंगी कृषी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
October 12th, 06:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ केला, ज्यासाठी एकूण 35,440 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पी एम धन धान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या तरतुदीसह सुरू करण्यात आली, तर डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी मोहीम सुरु करण्यात अली असून, त्यासाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली.नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 25th, 06:16 pm
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित
September 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन
August 07th, 09:20 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर आणि महिला आणि पुरुषहो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
August 07th, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 28th, 11:15 am
परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले
June 28th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.