ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरो येथील ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
July 07th, 05:19 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्युबाचे अध्यक्ष महामहिम मिगुएल डियाझ-कॅनेल बर्मुडेझ यांची भेट घेतली. यापूर्वी 2023 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष डियाझ-कॅनेल यांची पंतप्रधानांनी भेट घेतली होती, ज्यावेळी क्युबा विशेष आमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित होता.भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांना जागतिक नेत्यांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरूच
June 11th, 05:47 pm
देशाच्या पंतप्रधानपदाचा तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर आलेल्या अभिनंदनाच्या संदेशांबद्दल आणि दूरध्वनीवरून संपर्काबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत. मोदी यांनी या संदेशांना एक्स या समाजमाध्यवावर प्रतिसाद दिला आहे.