The courage, confidence and innovation of startups are shaping India's future: PM Modi
January 16th, 01:30 pm
On the occasion of National Startup Day, PM Modi addressed a programme marking a decade of the Startup India initiative in New Delhi. Highlighting the significant rise in the number of startups and unicorns over the past decade, the PM noted the growing participation of women in the startups. As India is set to host the AI Impact Summit in February 2026, the PM remarked that it presents a great opportunity for the youth and urged them to work hard and innovate.PM Modi addresses the programme marking a decade of Startup India in New Delhi
January 16th, 01:00 pm
On the occasion of National Startup Day, PM Modi addressed a programme marking a decade of the Startup India initiative in New Delhi. Highlighting the significant rise in the number of startups and unicorns over the past decade, the PM noted the growing participation of women in the startups. As India is set to host the AI Impact Summit in February 2026, the PM remarked that it presents a great opportunity for the youth and urged them to work hard and innovate.हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 06th, 08:14 pm
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
December 06th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.