पंतप्रधान उद्या म्हणजेच 20 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत उत्तरप्रदेश मधील 6 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत वितरीत करणार
January 19th, 04:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत उत्तरप्रदेश मधील 6.1 लाख लाभार्थ्यांना सुमारे 2691 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरीत करतील. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या मदतीमध्ये पीएमएवाय-जी अंतर्गत 5.30 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि यापूर्वी पहिल्या हप्त्याचा लाभ घेतलेल्या 80 हजार लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.पंतप्रधान आवास योजना-ग्रामीणअंतर्गत मध्यप्रदेशात बांधण्यात आलेल्या 1.75 लाख घरांचा उद्घाटन समारंभ ‘गृहप्रवेशम’ येत्या 12 सप्टेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार
September 10th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 सप्टेंबरला, मध्यप्रदेशात होणाऱ्या ‘गृहप्रवेशम’ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून सहभागी होणार असून, पंतप्रधान आवसा योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 1.75 लाख घरांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही सर्व घरे कोविड संसर्गाच्या आव्हानात्मक काळात बांधण्यात/पूर्ण करण्यात आली आहेत.