पंतप्रधान 27 सप्टेंबरला ओडिशाच्या दौऱ्यावर
September 26th, 09:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर 2025 रोजी ओडिशाचा दौरा करणार आहेत. 27तारखेला पंतप्रधान सकाळी 11.30 वाजता झारसुगुडा येथे 60,000 कोटी रूपया यांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी ते एका सार्वजनिक सभेला संबोधित देखील करतील. हे प्रकल्प दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, ग्रामीण गृहनिर्माण यांच्यासह इतर विविध क्षेत्रांमधील आहेत.तंत्रशिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा (MERITE) योजनेसाठी 4200 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय सहाय्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 08th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 175 अभियांत्रिकी आणि 100 पॉलिटेक्निक, अशा एकूण 275 तंत्रशिक्षण संस्थांमध्ये 'मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन' (MERITE), अर्थात तंत्रशिक्षण बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा (मेरीट) योजना राबवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (एनईपी-2020) ला अनुसरून उपाययोजना राबवून, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये तंत्रशिक्षणामधील गुणवत्ता, समता आणि प्रशासन सुधारणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.