आशिया करंडक 2025 च्या विजेत्या पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 08th, 07:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगिर इथे पार पडलेल्या आशिया करंडक 2025 स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. “गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत करत मिळविलेला हा विजय खूपच खास आहे”, असे मोदी म्हणाले.राष्ट्रीय क्रीडा दिनी बिहारमधील राजगीर इथे सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी आशिया चषक 2025 या स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
August 28th, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी आशिया कप 2025 मध्ये सहभागी झालेल्या आशियातील सर्व संघांना, खेळाडूंना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमधील राजगीर या ऐतिहासिक शहरात उद्या 29 ऑगस्ट रोजी या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचेही कौतुक केले आहे. बिहार हे अलिकडच्या काळात एक बहुआयामी क्रीडा केंद्र म्हणून उदयाला आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारने खेलो इंडिया युथ गेम्स 2025, 20 वर्षांखालील आशिया रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धा 2025, आंतरराष्ट्रीय सेपाकटकरॉ महासंघाची (ISTAF - International Sepaktakraw Federation) सेपाकटकरॉ विश्वचषक स्पर्धा 2024 आणि महिला आशियाई अजिंक्यपद चषक 2024 यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.