संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 29th, 10:15 am

काल राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब होते, 140 कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचा लेखाजोखा होते आणि 140 कोटी देशवासीयांपैकी विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अधोरेखित करणारे अत्यंत अचूक अभिभाषण होते. तसेच सर्व खासदारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक बाबी राष्ट्रपतींनी काल सभागृहासमोर मांडल्या. अधिवेशनाच्या प्रारंभीच आणि 2026 च्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या भावना अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व माननीय खासदारांनी त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या असतील. हे अधिवेशन खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 21व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या चतुर्थांशाची सुरुवात होत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे 25 वर्षांचे पर्व आता सुरू होत आहे. या शतकाच्या दुसऱ्या चतुर्थांशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला जी या देशाच्या अशा पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासात गौरवाचा क्षण म्हणून नोंदला जात आहे.

2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

January 29th, 10:00 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती, त्यांच्या परिश्रमाचे सिंहावलोकन आणि तरुणांच्या आकांक्षांचे अचूक प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या आणि 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्व संसद सदस्यांसमोर अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी साध्या शब्दांत व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी निश्चितपणे गांभीर्याने घेतल्या असतील, ज्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी यावर भर दिला की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 व्या शतकातील पहिल्या तिमाहीची समाप्ती आणि दुसऱ्या तिमाहीची सुरुवात दर्शवत आहे, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हा अर्थसंकल्प या शतकातील दुसऱ्या तिमाहीतील पहिला अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले की, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो भारताच्या संसदीय इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण आहे.

संसदेच्या सभागृहात भारताची सांस्कृतिक आणि भाषिक विविधता अधोरेखित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

December 23rd, 06:19 pm

लोकसभेतील भाषणांमध्ये प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जात असून संसदेच्या सभागृहात भारताची सांस्कृतिक आणि भाषिक विविधता अधोरेखित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला जी आणि सर्व पक्षांच्या खासदारांची प्रशंसा केली आहे.

नवी दिल्ली येथे खासदारांसाठी नव्याने बांधलेल्या सदनिकांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

August 11th, 11:00 am

कार्यक्रमाला उपस्थित ओम बिर्ला जी, मनोहर लाल जी, किरेन रिजिजू जी, महेश शर्मा जी, संसदेचे सर्व सन्मानित सदस्यगण, लोकसभेचे महासचिव, स्त्री आणि पुरुषगण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे उद्घाटन

August 11th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बाबा खरक सिंग मार्गावर संसद सदस्यांसाठी नव्याने बांधलेल्या टाईप-7 स्वरूपाच्या बहुमजली 184 सदनिकांचे उद्घाटन केले. अगदी काहीच दिवसांपूर्वी कर्तव्यपथ येथे बांधलेल्या कर्तव्य भवन या केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीचे उद्घाटन आपण केले आणि आज, संसदेतील आपल्या सहकाऱ्यांसाठी या निवासी संकुलाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधान या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. या संकुलातील चार बहुमजली इमारती - कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी यांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की त्यांची नावे चार महान नद्यांवरून दिलेली आहेत, ज्या नद्या लाखो जणांना जीवन देतात त्या नद्या आता लोकप्रतिनिधींच्या आयुष्यात आनंदाचा झरा निर्माण करतील. नद्यांची नावे देण्याच्या परंपरेमुळे देशाला एकतेच्या धाग्यात गुंफता येते असे ते म्हणाले. या नवीन संकुलामुळे खासदारांना नवी दिल्लीत राहणीमान सुलभता प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीत खासदारांसाठी सरकारी घरांची उपलब्धता आता वाढेल, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी सर्व संसद सदस्यांचे अभिनंदन केले आणि फ्लॅट्सच्या बांधकामात सहभागी अभियंते आणि श्रमजीवींचे कौतुक केले, तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या समर्पण भावनेची आणि कठोर परिश्रमाची त्यांनी प्रशंसा केली.

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार

August 10th, 10:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर संसद सदस्यांसाठी नव्याने बांधलेल्या टाइप-7 बहुमजली 184 सदनिकांचे उद्घाटन करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट

December 02nd, 08:09 pm

रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसद सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला.

माजी संसद सदस्य प्रभात झा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

July 26th, 01:05 pm

माजी संसद सदस्य प्रभात झा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

खासदार डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

June 29th, 08:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राज्यसभा सदस्य (खासदार) डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार- पंतप्रधान

February 09th, 01:30 pm

माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.

राज्यसभेतल्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 08th, 12:20 pm

दर दोन वर्षांनी असा प्रसंग या सभागृहात येतो, परंतु हे सभागृह निरंतरतेचे प्रतीक आहे. पाच वर्षांनंतर लोकसभा नवीन रंग रुपाने सजते. या सभागृहाला दर 2 वर्षांनी एक नवी प्राणशक्ती प्राप्त होते, नवी ऊर्जा मिळते, नवी उमेद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते आणि म्हणून दर 2 वर्षांनी होणारा निरोप समारंभ हा एक प्रकारे निरोप नसतो. ते अशा स्मृती येथे सोडून जातात, ज्या येणाऱ्या नवीन फळीसाठी एक मौल्यवान वारसा आहेत. येथे त्यांच्या कार्यकाळात ते जो वारसा अधिक मौल्यवान बनवू इच्छितात.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पंतप्रधानांनी निरोप दिला

February 08th, 12:16 pm

पंतप्रधानांनी याप्रसंगी सांगितले की अधिक व्यापक सामाजिक मंचासाठी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना या सभागृहातील अनुभवाचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. “हे सभागृह म्हणजे सहा वर्षांच्या अनुभवांनी घडवलेले वैविध्यपूर्ण विद्यापीठ आहे. येथून जाणारा प्रत्येकजण समृद्ध होऊन जातो आणि जाताना देश उभारणीच्या कार्याला बळकटी देऊन जातो.” ते म्हणाले.

नमो अॅपमध्ये असा एक विशिष्ट विभाग आहे जो जनतेला स्थानिक खासदारांशी संपर्क साधण्यात मदत करतो- पंतप्रधानांनी दिली माहिती

October 16th, 09:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, नमो अॅपमध्ये असलेला एक विशिष्ट विभाग जनतेला स्थानिक खासदारांशी जोडून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. ते म्हणाले की हा विभाग आपल्या लोकशाहीवादी प्रेरणेला आणखी चालना देण्यासाठी दीर्घकाळ मदत करेल. ते पुढे म्हणाले की हा विभाग लोकांना त्यांच्या भागातील स्थानिक खासदाराशी असलेला संपर्क अधिक दृढ करणे शक्य करून देतो, या खासदारांसोबत काही बाबी ठरवणे सुलभ होण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि सरकारतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यात मदत देखील करतो.

लोकसभेमध्‍ये राज्यघटना (एकशे अठ्ठावीसावी सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर झाल्याचे पंतप्रधानांनी केले स्वागत

September 20th, 09:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राज्यघटना (एकशे अठ्ठावीसावी सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केल्याचे स्वागत केले आहे.

नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहाचे अध्यक्ष म्हणून काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

July 25th, 08:16 pm

नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहाच्या अध्यक्ष म्हणून काम केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मागील आठवड्यात त्यांचे उपाध्यक्षांच्या समितीवर नामनिर्देशन केले होते. या संदर्भात राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधान यांनी, “अतिशय अभिमानास्पद क्षण” असे म्हटले आहे.

देशाची समृद्धी ही कनेक्टिव्हिटीमध्ये आहे आणि ती आमच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च आहे: पंतप्रधान

February 25th, 09:46 am

उत्तर प्रदेशातील खजानी विधानसभा मतदारसंघातील बेलघाट ते सिक्रीगंज या 8 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी परिसरातील जनतेचे अभिनंदन केले आहे. संत कबीर नगरचे खासदार प्रवीण निषाद यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान बोलत होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाची माहिती निषाद यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली होती.

संसद रत्न पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

February 22nd, 12:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद रत्न पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बस्ती इथे दुसऱ्या ‘सांसद खेल महाकुंभ’च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे केलेले भाषण

January 18th, 04:39 pm

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माझे सहकारी, आपले युवा मित्र, खासदार हरीश द्विवेदी, विविध खेळांचे खेळाडू, राज्य सरकारचे मंत्रीगण, आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ज्येष्ठ, सन्माननीय व्यक्ती, आणि मी बघत आहे, सगळीकडे मोठ्या संख्येने जमलेला युवा समुदाय. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्ती जिल्ह्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे केले उद्‌घाटन

January 18th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. उत्तरप्रदेशातील बस्तीचे खासदार हरीश द्विवेदी 2021 पासून दरवर्षी बस्ती जिल्ह्यात, सांसद खेल महाकुंभचे आयोजन करतात. या खेल महाकुंभाअंतर्गत, कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा इनडोअर आणि आउटडोअर खेळ स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याशिवाय निबंध लेखन, चित्रकला, रंगकाम, रांगोळी अशा स्पर्धाही घेतल्या जातात.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

December 07th, 10:00 am

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. आपण 15 ऑगस्ट पूर्वी भेटलो होतो, त्यामुळे हे सत्र महत्वाचं आहे. 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता आपण सर्वजण अमृतकाळाच्या यात्रेत पुढे निघालो आहोत. आज आपण अशा वेळी भेटलो आहोत, जेव्हा देशाला, आपल्या भारताला जी-20 च्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. जागतिक समुदायात ज्या प्रकारे भारताचं स्थान निर्माण झालं आहे, ज्याप्रकारे भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि ज्याप्रकारे भारत जागतिक स्तरावर आपला सहभाग वाढवत आहे, अशा वेळी हे जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही एक खूप मोठी संधी आहे.