मदिना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
November 17th, 12:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रति तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.