आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना पंतप्रधानांची आदरांजली
June 25th, 10:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.India is not only a fast-growing economy, but also a credible one: PM Modi
June 22nd, 10:24 pm
Addressing the Republic Summit 2026, PM Modi highlighted how the spirit of “Nation First” has guided India’s achievements over the past decade. He said India is emerging as a fast-growing, credible and reliable global power and noted that Left Wing Extremism is breathing its last amid rapid development. He expressed confidence that the collective efforts of 140 crore Indians will realise the vision of a Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक शिखर परिषद 2026 ला केले संबोधित
June 22nd, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रिपब्लिक शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेतील सहभागींना अभिवादन करत, पंतप्रधानांनी जग वेगवान आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचे साक्षीदार ठरत असतानाच्या काळात, “महान शक्ती भारत: राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित चर्चेचे यजमानपद भूषवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ बलबीर पुंज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
April 19th, 12:08 am
बलबीर पुंज जी हे एक सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ होते, त्यांनी माध्यम जगताला समृद्ध करणारे मोठे योगदान दिले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले जात असे आणि त्यातून देशाच्या पुनरुत्थानाप्रती असलेली त्यांची प्रबळ ओढ दिसून येत असे, असेही त्यांनी म्हटले आहे. पुंज यांनी संसदेत केलेली भाषणे ही तथ्य आणि सिद्धांतांनी समृद्ध असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.Harivansh Ji plays a key role in instilling confidence that the country can make a significant leap forward: PM Modi in the Rajya Sabha
April 17th, 11:10 am
Addressing the Rajya Sabha, PM Modi extended heartfelt congratulations to Shri Harivansh on his election as Dy Chairman of the House. Lauding Harivansh Ji’s remarkable contributions to journalism, the PM said that new Members of Parliament from both Houses could learn immensely from his insights. The PM also highlighted the significant work done by Harivansh Ji across various sectors.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत भाषण
April 17th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केले आणि राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या हरिवंश यांचे हार्दिक अभिनंदन केले. हे एक ऐतिहासिक यश असल्याचे अधोरेखित करत, हरिवंश यांच्यावर आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर, सभागृहाने दाखवलेला दृढ विश्वास यातून प्रतिबिंबीत होतो, असे पंतप्रधान म्हणाले. “ सलग तिसऱ्यांदा उपसभापती म्हणून निवडून येणे, हे त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर आणि आणि त्यांच्या प्रतिष्ठित कार्यशैलीवर, सभागृहाने केलेले शिक्कामोर्तब आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान 13 एप्रिल रोजी ‘नारी शक्ती वंदन संमेलनाला’ संबोधित करणार
April 12th, 04:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नारी शक्ती वंदन संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मजकूर
December 01st, 10:15 am
हे हिवाळी अधिवेशन केवळ एक नित्यनेमाने होणारी घटना नाही. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ऊर्जा देईल, असा विश्वास मला वाटतो. भारत हा लोकशाही जगणारा देश आहे आणि आपण लोकशाहीवरील विश्वास दृढ करणाऱ्या मार्गांनी लोकशाहीबद्दल वाटणारा उत्साह वारंवार दाखवला आहे. बिहारमध्ये अलिकडेच झालेल्या निवडणुकीत जे विक्रमी मतदान झाले, ती लोकशाहीची खरी ताकद आहे. माता आणि भगिनींचा वाढता सहभाग ही नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करणारी महत्वाची बाब आहे. एकीकडे लोकशाहीची ताकद आणि या लोकशाही व्यवस्थेतील अर्थव्यवस्थेची ताकद यावर जग बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताने सिद्ध केले आहे, की लोकशाही चांगले परिणाम करू शकते. आज भारताची आर्थिक परिस्थिती ज्या वेगाने नवीन उंची गाठत आहे. हे केवळ आपल्यामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करत नाही तर विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला नवीन बळ देखील देते आहे.2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
December 01st, 10:00 am
संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले. हे अधिवेशन केवळ एक औपचारिकता नसून, देशाच्या सध्याच्या वेगवाग प्रगतीच्या वाटचालीकरता ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे ते म्हणाले. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एबीपी नेटवर्क इंडिया @2047 शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 06th, 08:04 pm
भारत मंडपमचा हा मंच आज सकाळपासून एक सजीव व्यासपीठ बनला आहे. नुकतीच मला तुमच्या पथकाची काही मिनिटांसाठी भेट घेण्याची संधी मिळाली. ही शिखर परिषद बऱ्याच विविधतेने नटलेली आहे. अनेक माननीय व्यक्तींनी या शिखर परिषदेत रंग भरले आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाही खूप छान अनुभव आला असेल. या परिषदेत मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांच्या असलेल्या उपस्थितीत बहुदा त्याचे अनोखेपण सामावले आहे. विशेषतः आमच्या ड्रोन दीदी आणि लखपती दीदींनी त्यांचे अनुभव सामायिक केले. जेव्हा मी नुकताच या सर्व निवेदकांना भेटलो तेव्हा मी पहात होतो की ते त्यांचे अनुभव अत्यंत उत्साहाने सामायिक करित आहेत. त्यांचा प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात होता. याचा अर्थ असा की ही एक खूपच प्रेरणादायी संधी साध्य झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनाला केले संबोधित
May 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत मंडपममधील या कार्यक्रमात सकाळपासूनच उत्साहाचा संचार आहे. त्यांनी आयोजकांच्या चमूसोबतच्या संवादाचा उल्लेख केला आणि शिखर संमेलनातील समृद्ध विविधता अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या गतिशीलतेमध्ये योगदान दिलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहभागाची त्यांनी दखल घेतली. सर्व उपस्थितांना अत्यंत सकारात्मक अनुभव आला असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. शिखर संमेलनात युवा वर्ग आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती अधोरेखित करताना, त्यांनी विशेषतः ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी अनुभवांकडे लक्ष वेधले. त्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले.रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 26th, 11:23 am
आज 51000 हून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पक्क्या सरकारी नोकरीची पत्रे देण्यात आली आहेत. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तरुणांच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली आहे. तुमची जबाबदारी देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याची आहे, तुमची जबाबदारी देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याची आहे, देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही तुमची जबाबदारी आहे, कामगारांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमची कामे जेवढ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल तेवढा त्याचा सकारात्मक परिणाम विकसित भारताच्या प्रवासावर पडलेला दिसेल. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
April 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले; याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्यात आले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे, असे पंतप्रधानांनी आजच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्यक कर्तव्ये पार पाडण्याचे काम या तरुणांना करावयाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित कले. नव्याने कामावर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पण भावाने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र मोठी झेप घेण्यासाठी सज्ज
September 18th, 04:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत, कलम 8 कंपनी म्हणून भारतात ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) साठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई), अर्थात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना करायला मान्यता दिली. यामध्ये भारतीय वाणिज्य आणि उद्योग संघटना आणि भारतीय उद्योग महासंघ भारत सरकारचे भागीदार म्हणून उद्योग संस्थांचे प्रतिनिधित्व करतील. भारतात मुंबईमध्ये एनसीओई ची स्थापना केली जाईल. हा निर्णय, देशात AVGC टास्क फोर्स (कृती दल) स्थापन करण्याबाबत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांनी 2022-23 साठीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेला अनुसरून आहे.मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 13th, 09:33 pm
सर्वात आधी मी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सर्व सदस्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना आज मुंबईत एक भव्य आणि आधुनिक वास्तू मिळाली आहे. या नव्या वास्तूमध्ये तुमच्या कामकाजाचा जो विस्तार होईल, तुमची काम करण्यातील सुलभता वाढेल त्यामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होईल, अशी मला आशा वाटते. इंडियन न्यूजपेपर सोसायटी ही संस्था आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी देशात कार्यरत असलेल्या संस्थांपैकी एक आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या देशाच्या वाटचालीतील प्रत्येक चढ-उतार देखील फार जवळून बघितला आहे, ते क्षण तुम्ही प्रत्यक्ष जगला आहात आणि जन-सामान्यांना त्याबद्दल सांगितले देखील आहे; म्हणूनच, एक संस्था म्हणून तुमचे कार्य जितके अधिक प्रभावी बनेल तितका देशाला त्याचा अधिकाधिक फायदा होईल.पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन
July 13th, 07:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल मधील जी-ब्लॉक येथील इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) सचिवालयाला भेट दिली आणि आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन केले. नवीन इमारत मुंबईतील आधुनिक आणि कार्यक्षम कार्यालयाबाबत आयएनएसच्या सदस्यांच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करेल आणि मुंबईतील वृत्तपत्र उद्योगासाठी 'नर्व्ह सेंटर ' म्हणून काम करेल.