मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अर्पण केली आदरांजली

November 11th, 09:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे पथदर्शक विचारवंत आणि प्रज्ञावंत होते. स्वातंत्र्य लढ्यातली त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

November 11th, 10:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त आज श्रद्धांजली अर्पण केली.