नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

September 12th, 04:54 pm

आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

September 12th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.

गणितज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक

November 12th, 11:36 am

सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

छोट्या रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांमुळे मोठ्या डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 24th, 11:30 am

मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

May 16th, 12:05 pm

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.