गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी आलेल्या शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली
September 19th, 04:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची भेट घेऊन गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारले. पंतप्रधान मोदी म्हणाले की पवित्र अवशेष जितके महत्त्वाचे आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत तसेच ‘जोरे साहिब’ देखील वैभवशाली शीख इतिहासाचा भाग आहेत आणि तितकेच ते आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे देखील प्रतीक आहेत. “हे पवित्र अवशेष येणाऱ्या पिढ्यांना गुरु गोविंद सिंहजींनी दाखवलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि सामाजिक एकोप्याच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरित करतील,”पंतप्रधान पुढे म्हणाले.