मुंबईत मेरीटाईम लीडर्स परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 29th, 04:09 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, शांतनु ठाकूर जी, कीर्तिवर्धन सिंह जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, नौवहन आणि इतर उद्योगांशी संबंधित नेते, इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले संबोधित

October 29th, 04:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित केले तसेच सागरी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे (ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम) अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी ग्लोबल मेरीटाईम लीडर्स परिषदेला उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम 2016 मध्ये मुंबईत सुरू झाला आणि आता तो जागतिक शिखर परिषद म्हणून विकसित झाला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 85 हून अधिक देशांचा सहभाग असणे, ही गोष्‍ट एक मजबूत संदेश देत आहे , यावर मोदी यांनी भर दिला. या कार्यक्रमात आघाडीच्या प्रमुख नौवहन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , स्टार्टअप्स, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांच्या उपस्थितीची त्यांनी दखल घेतली. छोटी बेटे असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, अशा सर्वांच्या सामूहिक दृष्टिकोनामुळे शिखर परिषदेची ऊर्जा आणि समन्वय लक्षणीयरीत्या वाढला आहे.

22व्या आसियान - भारत शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रारंभिक भाषण

October 26th, 02:20 pm

आसियानच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी, मी पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारताच्या समन्वयक देशाची भूमिका कौशल्यतेने पार पाडल्याबद्दल फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांचे आभार मानतो. आणि आसियानच्या नव्या सदस्याच्या रूपात तिमोर लेस्टे चे स्वागत करतो.

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

October 26th, 02:06 pm

22 वी आसियान-भारत शिखर परिषद 26 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. पंतप्रधान आणि आसियान नेत्यांनी आसियान-भारत संबंधांमधील प्रगतीचा संयुक्तपणे आढावा घेतला आणि सर्वंकष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या उपक्रमांवर चर्चा केली. पंतप्रधानांचा भारत-आसियान शिखर परिषदेतील हा 12 वा सहभाग होता.

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन

October 09th, 11:25 am

पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्‍ये प्रसारमाध्‍यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन

September 11th, 12:30 pm

आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.

भारत सिंगापूर संयुक्त निवेदन

September 04th, 08:04 pm

सिंगापूरचे पंतप्रधान मा. लॉरेन्स वाँग यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने, भारत आणि सिंगापूर यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारीसाठीच्या कार्ययोजना (रोडमॅप) विषयक संयुक्त निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन

September 04th, 12:45 pm

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान वोंग यांच्या पहिल्या भारत भेटीचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ही भेट आणखी खास आहे कारण यावर्षी आम्ही द्विपक्षीय संबंधांचा साठावा वर्धापनदिन साजरा करत आहोत.

जपानच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना निवेदन

August 29th, 03:59 pm

आज आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीत एका नवीन आणि सोनेरी अध्यायाचा मजबूत पाया रचला आहे. आम्ही आगामी दशकासाठी एक रूपरेषा आखली आहे. आमच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी गुंतवणूक, नवोन्मेष, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, लोकांमधील आदानप्रदान आणि राज्य-प्रादेशिक भागीदारी या प्रमुख बाबी आहेत. आम्ही आगामी दहा वर्षांमध्ये जपानमधून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारत आणि जपानमधील लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल.

फिजीच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

August 25th, 12:30 pm

त्यावेळी आम्ही फोरम फॉर इंडिया - पॅसिफिक आयलंड कोऑपरेशन (पॅसिफिक बेटांच्या सहकार्यासंबंधीचा भारतासाठी मंच) म्हणजे 'फिपिक'चा प्रारंभ केला. त्या पुढाकाराने केवळ भारत- फिजी संबंधच नव्हे, तर संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रासमवेत असलेल्या आमच्या संबंधांना नवीन ताकद प्राप्त झाली. आणि आज पंतप्रधान राबुका यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून या सहसंबंधांमध्ये नवा आयाम जोडला जातो आहे.

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनियर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

August 05th, 03:45 pm

आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या द्विपक्षीय संबंधांच्यासंदर्भात एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण भारत-फिलिपिन्स संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर घेऊन जात आहोत. यामुळे आपल्या संबंधांना एक नवीन गती आणि सघनता मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आपल्या संबंधांना बळ मिळेल. गेल्या काही वर्षांत, आपल्या एकमेकांच्या सर्व क्षेत्रातील संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, सागरी, आरोग्य, सुरक्षा, अन्न सुरक्षा, विकास भागीदारी आणि नागरीकांना एकमेकांविषयीचा असलेला जिव्हाळा यांचा समावेश आहे. आज आपण पुढील पाच वर्षांसाठी एक कृती आराखडा बनवत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे.

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन

August 05th, 11:06 am

सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण - महाराडिया लावना - हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

July 25th, 08:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.

पंतप्रधानांची युनायटेड किंगडम आणि मालदीव भेट (23 – 26 जुलै 2025)

July 20th, 10:49 pm

पंतप्रधान मोदी 23 - 26 जुलै दरम्यान UK ला अधिकृत भेट देणार असून मालदीवचा सरकारचे निमंत्रित अतिथी म्हणून दौरा करणार आहेत. ते पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी विस्तृत चर्चा करतील तसेच CSP च्या प्रगतीचा आढावा देखील घेतील. 26 जुलै रोजी मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिन सोहळ्याचे पंतप्रधान मोदी 'सन्माननीय अतिथी' असतील. ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांची भेट घेणार असून त्यांच्यात परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा नेटुम्बो नंदी-नदैतवा यांची घेतली भेट

July 09th, 07:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या अधिकृत दौऱ्या दरम्यान आज विंडहोक येथील स्टेट हाऊसमध्ये नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा डॉ.नेटुम्बो नंदी-नदैतवा यांची भेट घेतली. स्टेट हाऊसमध्ये आगमन झाल्यावर, राष्ट्राध्यक्षा नंदी-नदैतवा यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्नेहमय स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान स्तरावर भारताकडून तब्बल 27 वर्षांनंतर नामिबियाचा हा दौरा होत आहे. या वर्षी मार्चमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती नंदी-नदैतवा यांनी आयोजित केलेली ही पहिलीच द्विपक्षीय राजकीय भेट होती.

घानाच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

July 03rd, 12:32 am

तीन दशकांच्या मोठ्या खंडानंतर भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत.

सायप्रसच्या अध्यक्षांसमवेतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

June 16th, 01:45 pm

सर्वप्रथम स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आदरणीय राष्ट्राध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानतो.सायप्रसच्या भूमीवर काल पाऊल ठेवल्यापासून, राष्ट्राध्यक्ष आणि या देशाच्या जनतेचा स्नेह आणि आपुलकी याने मी भारावून गेलो आहे.

अंगोलाच्या राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

May 03rd, 01:00 pm

मी राष्ट्रपती लोरेंसू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 38 वर्षांनी अंगोलाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे केवळ भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती मिळत आहे, तर भारत आणि आफ्रिका यांच्यातील भागीदारीला देखील बळ मिळत आहे.

पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या समारोपाबाबत संयुक्त निवेदन

April 23rd, 12:44 pm

सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्या निमंत्रणावरून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.

6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

April 04th, 12:59 pm

सुरुवातीला, मी या शिखर परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल थायलंडच्या पंतप्रधान महामहिम शिनावात्रा आणि थायलंड सरकारचे मनापासून आभार मानतो.