पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

April 04th, 08:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले असून, त्यांच्या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांमुळे ते विशेषतः लक्षात राहतील, असे म्हटले.