I am taking action against corruption, and that's why some people have lost their patience: PM Modi in Meerut

March 31st, 04:00 pm

Ahead of the Lok Sabha Election 2024, PM Modi kickstarted the Bharatiya Janata Party poll campaign in Uttar Pradesh’s Meerut with a mega rally. Addressing the gathering, the PM said, “With this land of Meerut, I share a special bond. In 2014 and 2019... I began my election campaign from here. Now, the first rally of the 2024 elections is also happening in Meerut. The 2024 elections are not just about forming a government. The 2024 elections are about building a Viksit Bharat.”

PM Modi addresses a public meeting in Meerut, Uttar Pradesh

March 31st, 03:30 pm

Ahead of the Lok Sabha Election 2024, PM Modi kickstarted the Bharatiya Janata Party poll campaign in Uttar Pradesh’s Meerut with a mega rally. Addressing the gathering, the PM said, “With this land of Meerut, I share a special bond. In 2014 and 2019... I began my election campaign from here. Now, the first rally of the 2024 elections is also happening in Meerut. The 2024 elections are not just about forming a government. The 2024 elections are about building a Viksit Bharat.”

वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 23rd, 02:11 pm

आज पुन्हा वाराणसीला येण्याची संधी मिळाली. वाराणसीमध्ये येऊन झालेला आनंद शब्दात मांडणे अशक्य आहे. पुन्हा एकदा म्हणा...ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! आज मी अशा दिवशी काशीमध्ये आलो आहे जेव्हा चंद्राच्या ‘शिवशक्ती’ या स्थानावर भारत पोहोचलेल्याला एक महिना पूर्ण होत आहे. ‘शिवशक्ती’ म्हणजे गेल्या महिन्याच्या 23 तारखेला आपले चांद्रयान जिथे उतरले ते स्थान आहे. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे. तर शिवशक्तीचे दुसरे स्थान माझ्या या काशीत आहे. आज शिवशक्तीच्या या स्थानावरून, शिवशक्तीच्या त्या स्थानावरील भारताच्या विजयासाठी मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी

September 23rd, 02:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. वाराणसीतील गंजरी, रजतलाब येथे सुमारे 450 कोटी रुपये खर्चून हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम विकसित केले जाईल आणि त्याचे क्षेत्रफळ 30 एकरपेक्षा जास्त असेल.

तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 25th, 10:16 pm

उत्‍तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकुर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी निशीथ प्रामाणिकजी, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठकजी, इतर उपस्थित मान्यवर आणि ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमधे सहभागी झालेले सर्व खेळाडू, आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन !. आज उत्तरप्रदेश, देशभरातील युवा प्रतिभेचा संगम ठरला आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जे चार हजार खेळाडू इथे आले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश, वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. वेगवेगळ्या प्रदेशातील आहेत. मी उत्तरप्रदेशाचा खासदार आहे, उत्तरप्रदेशचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणूनच, उत्तरप्रदेशचा खासदार म्हणून, ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धे’ साठी आलेल्या आणि येणार असलेल्या सर्व खेळाडूंचे मी विशेष स्वागत करतो.

पंतप्रधानांनी तिसरी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरु झाल्याची केली घोषणा

May 25th, 07:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 सुरु झाल्याची घोषणा केली. या स्पर्धेत 21 क्रीडा प्रकारांमध्ये 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4750 हून अधिक खेळाडूंचा सहभाग असेल.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 02nd, 01:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.

उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

January 02nd, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.

पंतप्रधान 2 जानेवारीला मेरठला भेट देणार

December 31st, 11:11 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2 जानेवारी 2022 रोजी मेरठला भेट देणार असून दुपारी 1 वाजता तेथील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत. मेरठमधील सरधना भागातील सलावा आणि कैली या गावांत सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.