अजमेर येथून विकासकामांचे उद्घाटन व देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 28th, 12:00 pm

तीर्थक्षेत्र पुष्कर आणि सावित्री मातेच्या या पवित्र भूमीवर, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहाण्याची, आपले आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली आहे. या व्यासपीठावरून मी सुरसुराच्या तेजा धामला, पृथ्वीराजची भूमी अजमेरला नमस्कार करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रारंभ तसेच 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन

February 28th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. राजस्थानच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले, ज्यामध्ये सुरसुराचे तेजाजी धाम आणि मेजर दलपत सिंग ज्यांनी हैफा मुक्त करण्यात बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेचे अजूनही इस्रायलमध्ये आदराणे स्मरण केले जाते, त्यांच्या शौर्याचा समावेश आहे.

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात पंचप्रदा येथे उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण (१६ जानेवारी २०१८)

January 16th, 02:37 pm

दोन दिवसांपूर्वी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मकरसंक्रातीनंतर सण साजरा करण्यात आला. मकरसंक्रातीच्या नंतर संक्रमणाची, एका अर्थाने उत्क्रांतीची सुरुवात होते, त्याचे संकेत देणारा हा सण असतो. संक्रांतीनंतर उन्नती होणे अध्यारुतच आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वानंतर राजस्थानच्या भूमीवर संपूर्ण देशाला ऊर्जावान बनवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल, एक महत्वाची सुरुवात आज होते आहे. एक महत्वाचा प्रकल्प आज कार्यान्वित होतो आहे.

राजस्थानमधील बारमेर येथील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक सभेला केले मार्गदर्शन

January 16th, 02:35 pm

राजस्थानमधील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल सार्वजनिक सभेला मार्गदर्शन केले.

पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, इस्रायलमध्ये हऐफा इथे युद्ध समाधीस्थळाला भेट दिली

July 06th, 02:00 pm

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हाएफा इथे भारतीय युद्ध समाधीस्थळी भेट दिली.दोन्ही नेत्यांनी पहिल्या जागतिक युद्धात (WWI) इस्रायलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मेजर दलपत सिंग यांच्या स्मरणार्थ एका फलकाचे अनावरण केले