The Indo-Pacific represents the shared aspirations of like-minded democracies such as India and Australia: PM Modi at the Joint Press Meet

July 09th, 11:15 am

Addressing a joint press meet with Australian Prime Minister Anthony Albanese, PM Modi highlighted the expanding India-Australia Comprehensive Strategic Partnership. He also likened the India-Australia partnership to cricket, saying the agenda is One-Day focused, decisions are as fast as T20 and the partnership is as long and deep as a Test match.

पंतप्रधानांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत अधिकृत चर्चा

July 07th, 02:51 pm

इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.

इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

July 06th, 09:00 am

मी 6-11 जुलै 2026 दरम्यान म्यानमार, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहे. इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, मी 6-8 जुलै दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहे. 2018 मधील माझ्या पहिल्या इंडोनेशिया भेटीदरम्यान भारत आणि इंडोनेशियाने द्विपक्षीय संबंधांना 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उंचावले होते. आपल्या द्विपक्षीय संबंधांना हे नवीन रूप मिळाल्यानंतरची ही माझी पहिलीच द्विपक्षीय भेट असेल, तसेच ही भेट अध्यक्ष प्रबोवो यांच्या भारत भेटीनंतर होत आहे, जे 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अतिशय बळकट सांस्कृतिक आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांसोबत संबंध आहेत आणि माझी ही भेट आमच्या बहुआयामी भागीदारीच्या सर्व पैलूंना अधिक बळकट करेल. या भेटीदरम्यान, मी इंडोनेशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधेन आणि अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता येथील 'प्रम्बानन मंदिर' संकुलाला भेट देईन, जे आमच्यातील घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांचे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण आहे.

16th India-Japan Annual Summit Joint Statement

July 02nd, 10:22 pm

At the 16th India–Japan Annual Summit, PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi reaffirmed their commitment to advancing the India–Japan Special Strategic and Global Partnership through deeper cooperation in defence, economic security, clean energy, AI, technology, investment and people-to-people ties. The Joint Statement also sets the stage for celebrating the 75th anniversary of India–Japan diplomatic relations next year.

India-Japan Joint Statement on cooperation in the field of Artificial Intelligence (AI)

July 02nd, 10:14 pm

PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi agreed to deepen India-Japan cooperation in Artificial Intelligence with a shared vision for a safe, trusted and human-centric AI ecosystem. The partnership will drive collaboration in AI governance, digital infrastructure, research, innovation and talent development, while supporting resilient AI growth across the Indo-Pacific and the Global South.

पंतप्रधानांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट.

June 28th, 08:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिक्टोरिया, माहे येथे मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान रामगुलाम यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पदभार स्विकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही चौथी भेट आहे.

सेशेल्सच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन

June 28th, 02:02 pm

त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत.

पंतप्रधानांचा सेशेल्सचा राजकीय दौरा (27 ते 29 जून, 2026)

June 25th, 06:05 pm

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून, भारताच्या 'महासागर' संकल्पनेला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी 27-29 जून 2026 दरम्यान सेशेल्सचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला 'प्रमुख पाहुणे' म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्याशी चर्चा करतील. तसेच, ते सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला (संसदेला) संबोधित करतील आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि म्यानमारचे संयुक्त निवेदन

June 01st, 07:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग 30 मे ते 3 जून, 2026 या कालावधी साठी भारताच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौ-यावर आले आहेत.

Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam

May 06th, 05:24 pm

At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.

फलनिष्पत्ती सूची: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

May 06th, 03:44 pm

आयआरईएल (इंडिया) लिमिटेड आणि व्हिएतनामच्या इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी ऑफ रेडिओॲक्टिव्ह अँड रेअर एलिमेंट्स (आयटीआरआरई) यांच्यात परस्पर सहकार्याबाबत सामंजस्य करार

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन

May 06th, 01:00 pm

भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

March 24th, 09:11 pm

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट

February 20th, 10:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या राज्य भेटीनंतर, पंतप्रधान रामगुलाम यांचा त्यांच्या चालू कार्यकाळातील हा दुसरा भारत दौरा आहे. अलिकडेच 9 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या झालेल्या नेत्यांच्या दूरध्वनी संभाषणानंतर ही भेट झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून केली चर्चा

February 09th, 09:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.

Towards 2030: A Joint India-European Union Comprehensive Strategic Agenda

January 27th, 06:48 pm

The Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed at the 16th India-EU Summit held on 27 January 2026 in New Delhi, aims to further reinforce the strategic partnership by broadening, deepening and better coordinating EU-India cooperation to deliver mutually beneficial, concrete and transformative outcomes for both partners and for the wider world.

India - EU Joint Statement on the State Visit of European Council President and European Commission President to India and the 16th India-EU Summit

January 27th, 06:15 pm

At the invitation of PM Modi, European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen paid a State Visit to India as Chief Guests for the 77th Republic Day of India. During the visit, the leaders hailed the successful conclusion of negotiations on the landmark India–EU FTA and adopted the “Towards 2030: India–EU Joint Comprehensive Strategic Agenda.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी दूरध्वनीवरुन साधला संवाद

December 01st, 08:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

November 28th, 03:37 pm

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या श्रीलंकेच्या लोकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सर्व बाधित कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवकरात लवकर प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 20th, 10:30 am

आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.