पुद्दुचेरीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
March 01st, 12:00 pm
पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली
March 01st, 11:45 am
यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली.महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली
December 11th, 10:29 am
महाकवी भारती यांच्या कवितांमुळे धैर्य निर्माण केले; त्यांच्या विचारांमध्ये असंख्य लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्याची आणि भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतनेला प्रकाश देण्याची शक्ती होती, असे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम केले. तमिळ साहित्य समृद्ध करण्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे, असेही पुढे पंतप्रधानांनी म्हटले आहे