गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 11th, 12:00 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, तडफदार युवा उपमुख्यमंत्री हर्ष संघवी जी, गुजरात सरकारमधील मंत्री जीतू भाई वाघाणी, अर्जून भाई मोढवाड़िया, डॉ प्रद्युम्न वाजा, कौशिक भाई वेकरिया, खासदार राजेश भाई, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत , त्यांनाही माझ्याकडूनही जय सोमनाथ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व ला केले संबोधित

January 11th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा काळ अद्भुत आहे, हे वातावरण अद्भुत आहे आणि हा सोहळा देखील अद्भुत आहे. एका बाजूला स्वतः भगवान शंकर आहेत तर दुसरीकडे हा महासागर, सूर्याच्या हजारो किरणांच्या साक्षीने मंत्रांच्या जयघोषात श्रद्धेची लाट आहे. या अतिशय पवित्र वातावरणात, भगवान सोमनाथांच्या सर्व भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच दैवी आणि भव्य अनुभूती देणारा झाला आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याला सोमनाथ स्वाभिमान पर्व समारंभात सक्रिय सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण अतिशय भाग्यवान आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 72 तास अखंड चाललेला ओंकाराचा जप आणि 72 तास चाललेले मंत्रांचे अखंड पठण याची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की काल संध्याकाळी वेदिक गुरुकुलातील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हजारो ड्रोननी सोमनाथच्या हजारो वर्षांची गाथा साकार केली आणि आज 108 अश्वांसह मंदिरात शौर्य यात्रेचे आगमन झाले. मंत्र आणि भजन यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण हे शब्दातीत असून हा अनुभव केवळ काळच टिपू शकतो.

पंतप्रधान 25 नोव्हेंबर रोजी कुरुक्षेत्रला देणार भेट

November 24th, 12:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी हरियाणातील कुरुक्षेत्राला भेट देणार आहेत.

या आठवड्यात जगाच्या नजरेतील भारत

February 06th, 01:03 pm

या आठवड्यात, भारताने आपली जागतिक भागीदारी बळकट करण्यात, तांत्रिक आणि अंतराळ संशोधनात तसेच जागतिक संरक्षण आणि आरोग्य सेवा प्रयत्नांमधील योगदानात उल्लेखनीय प्रगती केली. इस्रायलसोबतचे संबंध दृढ करण्यापासून ते नवीन उपग्रह कार्यक्रम प्रक्षेपित करण्यापर्यंत आणि परदेशातील भारतीयांनी आपल्या प्रतिभेने मिळवलेल्या यशाची दखल घेण्यापर्यत, भारत आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आपले वाढते स्थान ठळकपणे दाखवून देत आहे. युरोप भारताकडे भविष्यातील सहकार्याची प्रमुख संधी म्हणून पाहत आहे. या आठवड्यातील काही प्रमुख घडामोडींवर एक नजर.

रामायण आणि महाभारताच्या अरबी भाषेतील भाषांतराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची केली प्रशंसा

December 21st, 07:03 pm

रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर करून, हे भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची प्रशंसा केली आहे.