पंतप्रधानांनी गुजरातमधील पोरबंदर येथील माधवपूर मेळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या

March 29th, 10:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पोरबंदर येथे सुरू असलेल्या माधवपूर मेळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. हा चैतन्यमय उत्सव आपल्या गौरवशाली संस्कृतीवर प्रकाश टाकतो आणि त्याचवेळी गुजरात आणि ईशान्य भारताच्या कालातीत सांस्कृतिक बंधाला अधिक दृढ करतो, असे मोदी म्हणाले. हा उत्सव विविध परंपरांना एकत्र आणतो, जो 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या खऱ्या भावनेचे दर्शन घडवतो. या मेळ्याला आवर्जून भेट देण्याचे मी जनतेला आवाहन करतो, असे मोदी यांनी नमूद केले.

भारतात आपल्या राष्ट्राच्या अद्वितीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवणारे अनेक चैतन्यदायी मेळावे: पंतप्रधान

April 01st, 09:19 am

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

पंतप्रधान 19-20 ऑक्टोबरला गुजरात भेटीवर

October 18th, 11:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19-20 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. यावेळी ते अंदाजे 15,670 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.

माधवपूर मेळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि चैतन्याचा अनोखा सोहळा - पंतप्रधान

April 10th, 01:20 pm

माधवपूर मेळा हा भारताची सांस्कृतिक विविधता आणि चैतन्याचा अनोखा सोहळा आहे असे वर्णन केलेला मन की बात चित्रफितीमधील एक भाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.