नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन
August 07th, 09:20 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर आणि महिला आणि पुरुषहो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
August 07th, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.India is one of the brightest spots in world economy : PM Modi at Bloomberg Economic Summit
March 28th, 07:03 pm