भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 17th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात केलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी एमजीआर यांच्या बहुआयामी वारशाचा गौरव केला आहे, तसेच तमिळनाडूच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि तमिळ संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले आहेत.

एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे केले स्मरण

January 17th, 08:26 am

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.