आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासोबत पंतप्रधानांनी केलेल्या संवादाचे भाषांतर
June 28th, 08:24 pm
आज तुम्ही मातृभूमीपासून, भारतभूमीपासून, सर्वात दूर आहात, पण भारतीयांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहात. तुमच्या नावातही शुभ आहे आणि तुमचा हा प्रवास एका नव्या युगाची सुरुवातही आहे. यावेळी बोलत आहोत आपण दोघे, पण माझ्यासोबत 140 कोटी भारतवासीयांच्या भावना देखील आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आणि आकांक्षा समाविष्ट आहेत. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ घेत नाहीये, तर सर्वात आधी हे सांगा, तिथे सर्व क्षेम-कुशल आहे ना? तुमची तब्येत ठीक आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत संवाद
June 28th, 08:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) जाणारे पहिले भारतीय ठरलेल्या ग्रुप कॅप्टन शुभ्रांशु शुक्ला यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की शुभांशु शुक्ला सध्या भारतीय मातृभूमीपासून सर्वात दूर असले तरी ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या सर्वाधिक समीप आहेत. शुभांशु यांच्या नावातच शुभत्व आहे आणि त्यांची ही अंतराळ यात्रा एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी म्हणाले की हे दोन व्यक्तींमधील संभाषण असले तरी ते 140 कोटी भारतीयांच्या भावना आणि उत्साह व्यक्त करत आहे. शुभांशु यांच्याशी बोलणारा हा आवाज संपूर्ण देशाचा सामूहिक उत्साह आणि अभिमान घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले, आणि अवकाशात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांनी शुभांशु यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी शुभांशु यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अंतराळ स्थानकावर सर्व काही ठीक आहे का, याची चौकशी केली.आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे उद्योग धुरिणांकडून कौतुक
October 15th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ – जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (आयटीयू-डब्ल्यूटीएसए) 2024 दरम्यान 8 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन केले. डब्ल्यूटीएसए ही डिजिटल तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ संस्थेच्या मानकीकरण कार्यासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी प्रशासकीय परिषद आहे. भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रथमच आयटीयू-डब्ल्यूटीएसए चे यजमानपद भूषवत आहे. 190 हून अधिक देशांतील दूरसंचार, डिजिटल आणि आयसीटी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3,000 हून अधिक उद्योग धुरीण, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांना एकत्र आणणारा हा एक महत्त्वाचा जागतिक कार्यक्रम आहे.