नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 28th, 11:15 am
परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले
June 28th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या आदर्शांच्या गहन प्रभावाचे पंतप्रधानांनी केले स्मरण
April 10th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या कालातीत शिकवणीचे स्मरण केले आणि त्यांच्या शिकवणीचा आपल्या स्वतःच्या जीवनावर असलेल्या खोल प्रभावाचे स्मरण केले.नवकार महामंत्र दिवसाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 09th, 08:15 am
मन शांत आहे, मन स्थिर आहे, केवळ शांतता आहे, एक अद्भुत अनुभूती आहे, शब्दांच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, नवकार महामंत्र अजूनही मनात गुंजत आहे. नमो अरिहंताणं॥ नमो सिद्धाणं॥ नमो आयरियाणं॥ नमो उवज्झायाणं॥ नमो लोए सव्वसाहूणं॥ मन स्थिर आहे , केवळ शांतता , एक स्वर, एक प्रवाह, एक ऊर्जा, कुठलाही चढउतार नाही, केवळ स्थिरता, केवळ समभाव . एक विशिष्ट चेतना, एकसमान लय, अंतर्मनात एकसमान प्रकाश. नवकार महामंत्राची ही आध्यात्मिक शक्ती मला अजूनही अंतर्मनात जाणवते. काही वर्षांपूर्वी मी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक मंत्रोच्चाराला उपस्थित होतो, आज तसाच अनुभव आला आणि तितकाच गहिरा. यावेळी, देशात आणि परदेशात एकाच वेळी एकाच चेतनेशी जोडलेले लाखो-कोट्यवधी पुण्य आत्मे, एकत्र बोललेले शब्द, एकत्र जागृत झालेली ऊर्जा , हे खरोखरच अभूतपूर्व आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन
April 09th, 07:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन केले आणि त्यात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवकार मंत्राचा गूढ आध्यात्मिक अनुभव अधोरेखित केला तसेच मनामध्ये शांती आणि स्थैर्य आणण्याच्या त्याच्या क्षमतेवर भर दिला. शब्द आणि विचारांच्या पलीकडे जाणारी, मन आणि चेतनेत खोलवर प्रतिध्वनित होणारी शांतीची असाधारण भावना त्यांनी विशद केली. नवकार मंत्राचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी त्यातील काही पवित्र श्लोक ऐकवले आणि हा मंत्र उर्जेचा एकीकृत प्रवाह असल्याचे सांगितले , जो स्थैर्य , समता आणि चेतना आणि आंतरिक प्रकाशाच्या सामंजस्यपूर्ण लयीचे प्रतीक आहे. आपले वैयक्तिक अनुभव कथन करताना , त्यांनी आपल्या अंतर्मनात नवकार मंत्राची आध्यात्मिक शक्ती कशी जाणवत आहे याबद्दल सांगितले. काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक जप कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली जिने त्यांच्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. पंतप्रधानांनी देशभरातील आणि परदेशातील लाखो सद्गुणी आत्म्यांचे एकात्मिक चेतनेत एकत्र येणे हा अतुलनीय अनुभव असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सामूहिक ऊर्जा आणि समन्वित शब्दांबाबत बोलताना ते खरोखरच असाधारण आणि अभूतपूर्व असल्याचे नमूद केले.सरदार धाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम भवन- दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 11th, 11:01 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, उपमुख्यमंत्री श्री नितीन भाई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री परशोत्तम रुपाला जी, श्री मनसुखभाई मांडवीय जी, अनुप्रिया पटेल जी लोकसभेतील खासदार आणि गुजरात प्रदेश जनता पार्टीच्या अध्यक्षा श्रीमाती मानसी पाटील जी, गुजरात सरकारमधले सगळे मंत्री, इथे उपस्थित सर्व सहकारी खासदार, गुजरातचे आमदार, सरदार धाम चे सर्व विश्वस्त, माझे बंधू, श्री गागजी भाई, विश्वस्त मंडळाचे सदस्य, या पवित्र कार्यात आपले योगदान देणारे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..पंतप्रधानांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे भूमीपूजन
September 11th, 11:00 am
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भूमीपूजन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.प्रत्येकाने लस घेणे आणि सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 25th, 11:30 am
मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 नोव्हेंबर 2020 रोजी जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंतीउत्सवा निमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण
November 14th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण 16 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हीडियो कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.