पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर
April 18th, 08:45 pm
आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला केले संबोधित
April 18th, 08:30 pm
भारतातील माता, भगिनी आणि कन्यांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सरकारच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' दुरुस्ती पारित होऊ शकली नाही, ज्यामुळे महिला वर्गाची रास्त स्वप्ने चिरडली गेली, असे त्यांनी नमूद केले. या दुर्दैवी परिस्थितीसाठी मी देशातील सर्व माता आणि भगिनींची मनापासून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधानांचे खासदारांना नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन; ही ऐतिहासिक संधी असल्याचे प्रतिपादन
April 17th, 02:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्तीबाबत संसदेत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आणि काल मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती, असे त्यांनी नमूद केले.Women’s participation reflects India’s cultural commitment as the Mother of Democracy: PM Modi in Lok Sabha
April 16th, 03:30 pm
During the three-day special Parliament session on the Women’s Reservation and Delimitation Bills, PM Modi addressed the Lok Sabha and urged unanimous support, adding that the credit will belong to all. Lauding women for their contributions to local governance, he reiterated that the reservation is their right. He also assured the House that the delimitation process will not discriminate against any region or state.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण
April 16th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत नारी शक्ती वंदन सुधारणा अधिनियम विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला. या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावर सकाळपासूनच चर्चा सुरु झाली यांची नोंद घेत, अनेक सहकाऱ्यांनी या चर्चेत तथ्य आणि तर्काच्या आधारे महत्त्वाच्या मुद्द्यांना परिणामकारकरीत्या स्पर्श केला असे पंतप्रधान मोदींनी नमूद केला. प्रत्येक देशाच्या इतिहासात महत्त्वाचे क्षण येत असतात असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधान म्हणाले की, त्या त्या काळातील सामाजिक मानसिकता आणि नेतृत्वाकडील क्षमता असे क्षण नोंदवून ठेवत, एक भक्कम राष्ट्रीय वारसा निर्माण करतात. संसदेतील आजची स्थिती हा भारताच्या संसदीय लोकशाहीमधील असाच एक ऐतिहासिक क्षण आहे असे सांगत ते म्हणाले की, महिला आरक्षणाची ही कल्पना आज परिपक्व होण्यासाठी ती सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीच अंमलात आणायला हवी होती. लोकशाहीची जननी म्हणून भारताची ख्याती असल्याचे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी सदनातील सर्व सदस्यांना या हजारो वर्षांच्या परंपरेला एक नवा सुधारणावादी आयाम देण्याची पवित्र संधी मिळाली आहे, याकडे लक्ष वेधले. देशातील निम्म्या लोकसंख्येला धोरण निर्मिती प्रक्रियेतील सक्रीय सहभागधारक बनवणे हा एक अतुलनीय सन्मान आहे यावर पुन्हा एकदा भर देत, ही महत्त्वाची संधी हातातून निसटू न देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना केले. सध्या होऊ घातलेल्या या परिवर्तनकारी प्रयत्नावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत, देशाची भविष्यकालीन स्थिती निश्चित करण्यासाठी सर्व भारतीय, एकत्रितपणे शासन प्रणालीमध्ये संवेदनशीलता रुजवण्याची तयारी करत आहेत असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. “आपण अशा एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत जिथे या मंथनातून हाती येणारे अमृत देशाची पुढील दिशा ठरवेल,” मोदींनी सांगितले.From Panchayat to Parliament, PM Modi outlines roadmap for women’s leadership at Nari Shakti Vandan Sammelan
April 13th, 11:15 am
In his address at the Nari Shakti Vandan Sammelan, PM Modi said the Nari Shakti Vandan Act must be implemented on time. Highlighting the critical role of women in the Viksit Bharat journey, the Prime Minister expressed satisfaction that his government has created schemes for every stage of women's life cycle. He also urged women to take the discussions from the programme to every village in the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन संमेलनाला केले संबोधित
April 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाला संबोधित केले. बैसाखी आणि देशातील विविध भागांमध्ये आगामी नववर्ष सोहळ्याचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी जालियानवाला बाग हत्याकांडातील शहिदांना आदरांजली वाहिली. भारत एकविसाव्या शतकातील एक मोठा निर्णय घेण्यासाठी सज्ज असून हा निर्णय नारी शक्तीला समर्पित आहे, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान 13 एप्रिल रोजी ‘नारी शक्ती वंदन संमेलनाला’ संबोधित करणार
April 12th, 04:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नारी शक्ती वंदन संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.Corruption and appeasement politics of LDF and UDF harm Keralam’s culture and faith: PM Modi in Thiruvalla
April 04th, 08:27 pm
Prime Minister Narendra Modi addressed a massive and enthusiastic gathering in Thiruvalla, energising supporters and expressing confidence that Keralam is on the cusp of a historic political transformation. Highlighting the unprecedented turnout, the Prime Minister said, “The massive presence of people here in Thiruvalla, your trust in the NDA, and the affection and confidence shown by mothers and sisters reflect the mood across Keralam. The state is heading towards a major transformation.”PM Modi’s Thiruvalla rally signals a big political shift in Keralam
April 04th, 03:35 pm
Prime Minister Narendra Modi addressed a massive and enthusiastic gathering in Thiruvalla, energising supporters and expressing confidence that Keralam is on the cusp of a historic political transformation. Highlighting the unprecedented turnout, the Prime Minister said, “The massive presence of people here in Thiruvalla, your trust in the NDA, and the affection and confidence shown by mothers and sisters reflect the mood across Keralam. The state is heading towards a major transformation.”नक्षलवादाविरुद्धच्या भारताच्या निर्णायक लढ्याबाबत अमित शाह यांनी लोकसभेत केलेले भाषण पंतप्रधानांनी केले सामायिक
March 30th, 09:53 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आज केलेले भाषण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. हे भाषण महत्त्वपूर्ण तथ्ये, ऐतिहासिक संदर्भ आणि गेल्या दशकातील सरकारच्या प्रयत्नांच्या सविस्तर आढाव्याने परिपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेक दशकांपासून प्रतिगामी स्वरूपाच्या माओवादी विचारसरणीमुळे अनेक प्रदेशांच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून, डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने असंख्य तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे, मोदी यांनी म्हटले आहे.पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे लोकसभेत निवेदन
March 23rd, 02:15 pm
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे भारतासमोर निर्माण झालेली आव्हाने यावर बोलण्यासाठी या प्रतिष्ठित सदनात मी उपस्थित आहे. सध्याची पश्चिम आशियाची परिस्थिती चिंताजनक आहे. मागच्या दोन -- तीन आठवड्यांमध्ये जयशंकर जी आणि हरदीप पुरी जी यांनी या विषयावर सदनाला आवश्यक ती माहिती दिली आहे. या संकटाला आता 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. याचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांच्या जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे म्हणूनच संपूर्ण जग, या संकटावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सर्व संबंधित पक्षांना आवाहन करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पश्चिम आशियातील संघर्षावर लोकसभेत निवेदन
March 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आणि त्यामुळे भारतासमोर उभ्या राहिलेल्या व्यापक आव्हानांवर आज लोकसभेत निवेदन केले. हे संकट आता तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू राहिले असून, त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि मानवी जीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहेत, असे नमूद करत पंतप्रधानांनी या समस्येच्या तातडीने निराकरणावर भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करताना मोदी म्हणाले, संपूर्ण जग सर्व पक्षांना हे संकट लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन करत आहे.India - Israel Joint Statement
February 26th, 07:44 pm
At the invitation of Israeli PM Benjamin Netanyahu, PM Modi paid a state visit to Israel from 25 to 26 February 2026. The two leaders noted the immense progress made in the India-Israel bilateral relationship across perse domains. They agreed to elevate the Strategic Partnership to a new level – ‘A Special Strategic Partnership for Peace, Innovation & Prosperity.’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
February 20th, 09:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनात कशा प्रकारे योगदान देईल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 12th, 02:13 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणात या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या आर्थिक परिवर्तनाला कसा हातभार लावेल याचे सर्वसमावेशक चित्र मांडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. “त्यांनी रिफॉर्म एक्सप्रेस, सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगांना पाठबळ, कौशल्य विकास, पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांना चालना देण्याचे प्रयत्न अशा मुद्द्यांवर भर दिला”, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे करणार उद्घाटन
January 14th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलातील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रकुलमधील सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
December 12th, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपले जीवन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करणारे एक अनुभवी नेते, म्हणून त्यांचे वर्णन केले.गृहमंत्र्यांनी लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा.
December 10th, 10:54 pm
गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.