केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांची तिसरी उच्चस्तरीय बैठक
August 20th, 09:37 pm
भारत सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांनी आज त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी, एक उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. पायाभूत सुविधा आणि संपर्क/दळणवळण व्यवस्था, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार तसेच प्रशासन अशी मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांशी चर्चा करत, पंतप्रधानांनी या विभागांच्या भविष्यातील अजेड्यांवर चर्चा केली.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी पंतप्रधानांच्या संवादाचा मूळ मजकूर
August 10th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद
August 10th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदक विजेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
August 09th, 10:07 pm
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारतासाठी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 7 लोक कल्याण मार्ग येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि क्रीडास्पर्धेतील त्यांचे अनुभव ऐकले.Prime Minister Narendra Modi Chairs Second High-Level Meeting with Secretaries of Government of India
July 28th, 08:48 pm
PM Modi chaired the second high-level meeting with Secretaries to the Government of India. The sectors discussed included Finance and Economy, Commerce and Industry and Technology. He stressed the need to reform processes, improve work culture and strengthen institutional efficiency, while also calling for greater participation of young innovators and entrepreneurs in the cybersecurity ecosystem.विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची उच्चस्तरीय बैठक
July 22nd, 07:37 pm
विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली.सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 13th, 06:55 pm
केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 13th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले
February 03rd, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पहावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.पंतप्रधानांनी एआय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी साधला संवाद
January 29th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
January 28th, 09:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.नीरज चोप्रा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
December 23rd, 03:53 pm
नीरज चोप्रा आणि त्यांच्या पत्नी हिमानी मोर यांनी आज नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. “आमचा विविध मुद्द्यांवर चांगला संवाद झाला, अर्थातच खेळांवरही!, पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी रशियाच्या अध्यक्षांचे केले स्वागत
December 05th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे भारतात स्वागत केले आहे.दृष्टीबाधित महिला टी20 विश्वकरंडक विजेत्या संघाशी पंतप्रधानांचा संवाद
November 28th, 10:15 am
सर, ती गाते हे तुम्हाला कसे कळलेभारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
November 28th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथे भारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी संवाद साधला. मोदींनी खेळाडूंशी अतिशय जिव्हाळ्याने बातचीत केली. त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले; आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करत त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाने पुढे जाणारे लोक केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील इतर क्षेत्रातही कधीच अपयशी ठरत नाहीत, यावर त्यांनी भर दिला. खेळाडूंनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे त्यांनी नमूद केले.हीमहामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी दिलेल्या कदंब रोपट्याचे पंतप्रधानांनी केले रोपण
September 19th, 05:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोक कल्याण मार्ग येथे महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी भेट दिलेले कदंब रोपट्याची लागवड केली. “पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा आहे ज्याची आम्ही नेहमीच विशेषत्वाने चर्चा करत असतो,” असे मोदी म्हणाले.नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 04th, 05:35 pm
आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले
September 04th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या विशेष समारंभातील क्षणचित्रे केली सामायिक
August 09th, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली येथील निवासस्थानी मुलांसोबत साजऱ्या केलेल्या रक्षाबंधनाच्या खास समारंभातील क्षणचित्रे सामायिक केली आहेत. नारी शक्तीच्या निरंतर विश्वास आणि प्रेमाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठक
May 10th, 02:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज नवी दिल्ली येथील 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी उच्च-स्तरीय बैठक पार पडली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.