Cabinet approves scheme of Chemical Parks “Bharat Audyogik Vikas Yojana Rasayan (BHAVYA Rasayan)
July 24th, 04:12 pm
The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the BHAVYA - Rasayan Scheme for establishing three dedicated Chemical Parks at a cost of ₹3,030 crore. The scheme, which will run for five years from FY 2026-27 to FY 2030-31, will lead to a cascading effect through enhanced development of downstream sectors of the economy, thereby generating higher employment and promoting greater economic growth, helping achieve the goal of Viksit Bharat @ 2047.कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 46 किलोमीटरने वाढणार
July 24th, 04:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बेल्लारी-गुंटकल विभागासाठी तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 1,264 कोटी रुपये इतका आहे.भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी: 2030 पर्यंतचा मार्गदर्शक आराखडा
July 11th, 08:06 am
भारत आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची 11 जुलै 2026 रोजी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे भेट झाली आणि त्यांनी भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारीच्या निर्मितीची घोषणा केली. दोन्ही पंतप्रधानांनी या भागीदारीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुढील चार वर्षांत भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एक सामायिक चौकट म्हणून या 2030 पर्यंतच्या मार्गदर्शक आराखड्याला मान्यता दिली. या धोरणात्मक भागीदारीमध्ये, या आराखड्यात खालील स्तंभांमध्ये नमूद केलेली क्षेत्रे आणि उपक्रम समाविष्ट आहेत, परंतु ती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.फलनिष्पत्तींची यादीः पंतप्रधानांचा अधिकृत न्यूझीलंड दौरा
July 11th, 08:03 am
या अंतर्गत संवाद, समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून हिंद-प्रशांत क्षेत्रात वाढीव सागरी सहकार्यासाठी एका चौकटीची स्थापना करण्यात येईल.भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदन
July 11th, 07:59 am
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 जुलै 2026 रोजी ऑकलंड, न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या 40 वर्षांतला भारतीय पंतप्रधानाचा न्यूझीलंडचा हा पहिलाच दौरा असून, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री व भागीदारीला एक नवीन दिशा देणारा आहे.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतPM to visit Rajasthan and Gujarat on 4 July
July 03rd, 11:25 am
PM Modi will visit Rajasthan and Gujarat on 4 July to launch development projects across multiple sectors. The Rajasthan visit includes the launch of the Modified UDAN Scheme in Jodhpur and the dedication of India’s first greenfield integrated Refinery-cum-Petrochemical Complex in Balotra. In Sanand, Gujarat, he will inaugurate the CG Semi OSAT facility with an annual production capacity of up to 5 billion semiconductor chips.जपानच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
July 02nd, 01:30 pm
भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान ताकाइची यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून एक दूरदर्शी आणि लोकप्रिय नेत्या आहेत. इतकेच नाही तर त्या जपानच्या 'नारा प्रीफेक्चर' (Nara Prefecture) मधल्या आहेत, जे भारत आणि जपानच्या सामायिक बौद्ध वारशाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' युद्धनौकांच्या जलावतरण समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 12:51 pm
आजचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करत आहे. मला आनंद आहे की या निमित्ताने मला बंगालच्या या महान भूमीवर येण्याची संधी मिळाली. ही ती भूमी आहे जिने भारताच्या विचारांना नवी दिशा दिली, भारताच्या पुनर्जागरणाला गती दिली आणि जिने शतकानुशतके भारताला सागरी मार्गाने जगाशी जोडले. आज याच भूमीवर 'आत्मनिर्भर भारत', 'सुरक्षित भारत' आणि 'विकसित भारत' शी संबंधित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होत आहे. काही वेळापूर्वीच 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' यांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. योगायोगाने, 21 जून हा दिवस 'जागतिक जलविज्ञान दिन' (World Hydrography Day) म्हणूनही साजरा केला जातो. आणि हा एक विलक्षण योगायोग आहे की याच दिवशी भारताचे सर्वात प्रगत हायड्रोग्राफी जहाज, 'आयएनएस संशोधक ' नौदलात सामील करण्यात आले आहे. मी भारतीय नौदल, या प्रकल्पांशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि माझ्या प्रिय देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी रचना आणि स्वदेशी बनावटीच्या तीन जहाजांचे – आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय यांचे जलावतरण
June 21st, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर, स्वदेशी बनावटीच्या आणि रचनेच्या तीन नौदल जहाजांचे - 'आयएनएस दुनागिरी' (एक प्रगत 'स्टेल्थ' फ्रिगेट), 'आयएनएस संशोधक' (एक मोठे टेहळणी जहाज) आणि 'आयएनएस अग्रय' (पाणबुडी-विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका ) जलावतरण करण्यात आले. या जहाजांच्या समावेशामुळे देशाच्या नौदल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल , सागरी क्षेत्राप्रती जागरूकता वाढेल आणि भू-राजकीय धोक्यांपासून आपल्या किनारपट्टीच्या जलक्षेत्राची सुरक्षा अधिक मजबूत होईल. या तिन्ही जहाजांचे संरेखन भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाइन ब्युरो'ने केले असून त्यांची बांधणी कोलकात्यातील 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स' (GRSE) द्वारे करण्यात आली; यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह भारतीय उद्योगांचा मोठा सहभाग होता. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर असलेली ही जहाजे आत्मनिर्भरतेप्रति भारताच्या वचनबद्धतेचा एक उत्तम दाखला आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,सीएमए सीजीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रॉडॉल्फ सादे यांच्यासोबत सागरी दळणवळण आणि परस्पर सहकार्याच्या संधी यावर केली चर्चा
June 18th, 06:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, सीएमए सीजीएम कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी प्रमुख, रॉडॉल्फ सादे यांच्यासोबत सागरी दळणवळण, जागतिक जहाज वाहतूक ट्रेंड्स आणि भारतात अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या सागरी क्षेत्रातील उदयोन्मुख संधी अशा विषयांवर अत्यंत फलदायी चर्चा झाली.केंद्रीय मंत्रिमंडळाने शेड्यूल्ड भारतीय विमान कंपन्यांसाठी विमान इंधनाच्या किंमती स्थिर राखण्यासाठी निधीला दिली मंजुरी
June 03rd, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शेड्यूल्ड भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजासाठी विमान इंधनाच्या किमतीत स्थैर्य आणण्यास पाठबळ देण्याकरता, तेल विपणन कंपन्यांसाठी 10,000 कोटी रुपये मर्यादेपर्यंतच्या एकरकमी अर्थसंकल्पीय साहाय्याला मंजुरी दिली आहे. तेल विपणन कंपन्यांना हे अर्थसंकल्पीय साहाय्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांच्या माध्यमातून आणि बिनव्याजी अग्रिम रकमेच्या स्वरूपात दिले जाईल. पश्चिम आशियातील संकटामुळे इंधनाच्या किमतींमध्ये सध्या सुरू असलेल्या चढ उतारांच्या परिस्थितीत, विमान कंपन्यांकरता स्थिर विमान इंधन दर सुनिश्चित करता यावेत या उद्देशाने तेल विपणन कंपन्यांना हे पाठबळ पुरवले जाणार आहे.म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि म्यानमारचे संयुक्त निवेदन
June 01st, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग 30 मे ते 3 जून, 2026 या कालावधी साठी भारताच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौ-यावर आले आहेत.इटलीच्या पंतप्रधानांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
May 20th, 05:00 pm
रोम, हे जगातील शाश्वत शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील माझा लोकसभा मतदारसंघ, काशी, हे देखील एक शाश्वत आणि चिरंतन शहर मानले जाते. जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात, तेव्हा संवाद केवळ कार्यक्रम पत्रिकेपुरता मर्यादित राहत नाही. यामध्ये इतिहासाची खोली, भविष्याची दूरदृष्टी आणि मैत्रीची सहजता, या तिन्ही गोष्टी एकत्र दिसून येतात.युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
May 18th, 05:00 am
सर्वात आधी, मला या गोलमेज बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे मनापासून आभार मानतो. ही बैठक गॉथेनबर्ग मध्ये आयोजित केली जात आहे, याचा मला आनंद आहे. हे एक असे शहर आहे जे नवोन्मेषासोबतच युरोपच्या उत्पादक वृत्तीचे एक जिवंत प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीला केले संबोधित
May 17th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2026 रोजी गॉथेनबर्ग येथे 'युरोपियन उद्योगांच्या गोलमेज बैठकीला (ERT) संबोधित केले. व्हॉल्वो समूहाने (Volvo Group) आयोजित केलेल्या या संवाद सत्रात स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा महामहीम उर्सुला वॉन डेर लेयेन, युरोपियन उद्योगांचे वरिष्ठ नेते आणि आघाडीच्या युरोपियन आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.Prime Minister meets with Dutch CEOs
May 16th, 10:15 pm
PM Modi and Netherlands PM Rob Jetten met and held discussions with prominent CEOs of leading Dutch companies. The business leaders made presentations on three clusters and outlined their strategies for India. The PM appreciated the growing interest of Dutch companies in India’s economic vibrancy and encouraged Dutch companies to explore opportunities in India.गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्याचा समावेश असलेल्या एका नवीन प्रकल्पाला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी, भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 134 किलोमीटरने वाढणार
May 13th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या अहमदाबाद (सरखेज) – धोलेरा सेमी हाय-स्पीड दुहेरी मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 20,667 कोटी रुपये आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा भारतीय रेल्वेचा पहिला सेमी हाय-स्पीड प्रकल्प असेल.केंद्रीय मंत्रिमंडळाने मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील 19 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या तीन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्याचा होईल सुमारे 901 किलोमीटरने विस्तार
May 05th, 07:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 23,437 कोटी रुपये एकूण खर्चाच्या 3 (तीन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे: