पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज कालावधीला 31.12.2024 नंतर मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
August 27th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज देण्याच्या कालावधीची मुदत 31.12.2024 नंतर वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. कर्ज देण्याचा कालावधी आता 31 मार्च 2030पर्यंत वाढविण्यात आला आहे. या योजनेचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. पुनर्रचित योजनेचा उद्देश 1.15 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणे आहे ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थींचा समावेश आहे.कोविड बाधित क्षेत्रासाठी कर्ज हमी योजना (एलजीएससीएएस) आणि आपत्कालीन कर्ज हमी योजनेचा (ईसीएलजीएस) निधी वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 30th, 06:57 pm
कोविड 19 च्या दुसर्या लाटेमुळे विशेषतः आरोग्य क्षेत्रात उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कोविड बाधित क्षेत्रासाठी कर्ज हमी योजनेला (एलजीएससीएएस) मंजुरी दिली असून त्यासाठी आरोग्य / वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित सध्याच्या सुविधांचा विस्तार आणि नवीन प्रकल्पांसाठी आर्थिक हमी सुरक्षा प्रदान करण्यासाठी 50,000 कोटी रुपये निधीच्या तरतुदीला मान्यता दिली आहे.