दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 04th, 10:45 am

मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित

October 04th, 10:29 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

September 20th, 11:00 am

आपल्या भावनगरने तर अगदी ‘धमाका‘च केला आहे, हे आत्ता लक्षात आले. आज इथे मला मंडपाबाहेर जनसागर - जणू माणसांचा समुद्र दिसतोय. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमाला केले संबोधित; भावनगर, गुजरात येथे 34,200 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

September 20th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भावनगर इथे 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित जनतेचे स्वागत केले. 17 सप्टेंबर रोजी मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा उल्लेख करत, लोकांकडून मिळालेले प्रेम हा उर्जेचा मोठा स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत, म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत, देश 'सेवा पंधरवडा' साजरा करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांत गुजरातमध्ये अनेक सेवाभावी उपक्रम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. शेकडो ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, आतापर्यंत एक लाख व्यक्तींनी रक्तदान केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, लाखो नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात 30,000 हून अधिक आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, तिथे सामान्य जनतेला आणि विशेषतः महिलांना वैद्यकीय तपासणी आणि उपचार पुरवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी देशभरातील सेवा उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आणि आभार मानले.

पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज कालावधीला 31.12.2024 नंतर मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

August 27th, 02:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज देण्याच्या कालावधीची मुदत 31.12.2024 नंतर वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. कर्ज देण्याचा कालावधी आता 31 मार्च 2030पर्यंत वाढविण्यात आला आहे. या योजनेचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. पुनर्रचित योजनेचा उद्देश 1.15 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणे आहे ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थींचा समावेश आहे.

दिल्लीमध्ये विविध विकासकामांच्या पायाभरणी, उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

January 03rd, 01:03 pm

तुम्हा सर्वांना वर्ष 2025 च्या खूप-खूप शुभेच्छा. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. ,जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने आपला प्रवास यावर्षी आणखी वेगवान होणार आहे. आज भारत, जगात राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक बनत आहे. 2025 या वर्षात भारताची ही भूमिका अधिक मजबूत होईल. हे वर्ष जगात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करण्याचे वर्ष असेल, हे वर्ष भारताला जगातील सर्वात मोठे निर्मिती केंद्र बनवण्याचे वर्ष असेल, हे वर्ष, युवकांना नवीन स्टार्टअप आणि उद्यमशीलतेमध्ये वेगाने पुढे नेण्याचे वर्ष असेल , हे वर्ष कृषी क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे वर्ष असेल. हे वर्ष महिला-प्रणित विकासाच्या आपल्या मंत्राला नवी उंची देण्याचे वर्ष असेल,हे वर्ष जीवन सुलभता वाढवण्याचे, जीवनमान उंचावण्याचे वर्ष असेल. आजचा हा कार्यक्रम देखील याच संकल्पाचा एक भाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

January 03rd, 12:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा ठाम विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या घडीला भारताने राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचे जागतिक प्रतिक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आगामी वर्षात देशाची प्रतिमा आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मधील आपले संकल्पित ध्येय उद्दिष्ट देखील उपस्थितांसमोर मांडले. जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनणे, देशातल्या युवा वर्गाचे स्टार्ट - अप आणि उद्योजकतेच्या दृष्टीने सक्षमीकरण करणे, कृषी क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करणे, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणे आणि जीवन सुलभतेवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हे वर्ष भारताचे असेल यावर त्यांनी आपल्या संबोधनात भर दिला.

प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्‍यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

November 06th, 03:14 pm

प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. पीएम विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्या धोरणात प्रतिभावान विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विविध उपायांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्याला दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळेल तो विद्यार्थी, त्याच्या अभ्यासक्रमाचे शुल्क आणि या अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची गरज भागवण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थांमधून तारण विरहित, हमीदार विरहित कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल. एका साध्या, पारदर्शक, विद्यार्थी स्नेही प्रणालीच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आंतर-परिचालनक्षम आणि संपूर्णपणे डिजिटल असेल.