पंतप्रधानांकडून उत्कल दिबसनिमित्त शुभेच्छा व्यक्त.
April 01st, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'उत्कल दिबसनिमित्त ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिसा हे राज्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महानतेचे एक अजरामर प्रतीक म्हणून ओळखले जाते, असे मोदी यांनी नमूद केले. ओदिशाच्या संगीत, कला आणि साहित्याने भारताला विविध प्रकारे समृद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.ओदिशाचे लोक त्यांची जिद्द, साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखले जातात, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात ओदिशा प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत राहो, हीच सदिच्छा.आसाममधील सिलचर इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 14th, 11:10 am
आसाम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल , इथे उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील सिल्चर येथे 23,550 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
March 14th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील सिल्चर येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संस्कृती आणि चैतन्यशीलता अशी खास ओळख असलेल्या बराक खोऱ्याला भेट देणे हा माझ्यासाठी नेहमीच विशेष अनुभव असतो. इतिहास आणि भाषांच्या मिलाफामुळे अद्वितीय प्रादेशिक ओळख निर्माण करणाऱ्या या खोऱ्याचे सिल्चर हे प्रवेशद्वार म्हणून काम करते,असे मोदी यांनी नमूद केले. या प्रदेशाची ताकद त्याच्या विविधतेत आहे, बंगाली, आसामी आणि आदिवासी परंपरा इथे एकोप्याने बहरतात. बराक खोऱ्याची विविधता ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असून ती येथील नागरिकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेस चालना देते, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.मणिशंकर मुखोपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
February 20th, 07:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिशंकर मुखोपाध्याय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.थिरू डी. ज्ञानसुंदरम् जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
January 26th, 09:48 pm
तामिळ संस्कृती आणि साहित्य यांच्यासाठी डी. ज्ञानसुंदरम् जी यांचे योगदान कायमच स्मरणात राहील असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांच्या लेखन आणि आजीवन समर्पणातून त्यांनी समाजाची सांस्कृतिक जाणीव समृद्ध केली आणि त्यांचे कार्य वाचक आणि विद्वानांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.प्रसिद्ध लेखक विनोद कुमार शुक्ला जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
December 23rd, 07:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित विनोद कुमार शुक्ला जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. हिंदी साहित्य विश्वात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे.नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
November 01st, 02:27 pm
नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आहे.प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि विचारवंत एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
September 24th, 04:29 pm
प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि विचारवंत एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. भैरप्पा हे राष्ट्राच्या चेतनेला जागृत करणारे आणि भारताच्या आत्म्याचा गहन शोध घेणारे थोर व्यक्तिमत्त्व होते, असे पंतप्रधान म्हणाले.तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 27th, 12:30 pm
परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण, चिन्मया मिशनचे स्वामीगण, तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. एल मुरुगन जी, स्थानिक खासदार थिरुमा-वलवन जी, मंचावर उपस्थित तामिळनाडूचे मंत्री, संसदेतील माझे सहकारी आदरणीय इलैयाराजा जी, सर्व ओदुवार, भक्त, विद्यार्थी, सांस्कृतिक इतिहासकार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! नमः शिवायपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम येथे आदि थिरुवादिरई महोत्सवाला केले संबोधित
July 27th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम मंदिरात झालेल्या आदि थिरुवादिरई महोत्सवाला संबोधित केले. सर्वशक्तिमान भगवान शिव यांना त्यांनी वंदन केले. इलायराजा यांच्या संगीताच्या आणि ओदुवार यांच्या पवित्र मंत्रोच्चाराच्या साथीने, राजराजा चोल यांच्या पवित्र भूमीत दिव्य शिवदर्शनातून अनुभवायला मिळालेल्या गहन आध्यात्मिक ऊर्जेचे त्यांनी स्मरण केले. या आध्यात्मिक वातावरणामुळे आपले मन भारले गेल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.पंतप्रधानांच्या घाना दौऱ्यात विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार
July 03rd, 04:01 am
• द्विपक्षीय संबंधांचे व्यापक भागीदारीमध्ये रूपांतर करणेगुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
May 09th, 02:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
December 26th, 10:16 am
मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.