पंतप्रधानांनी आपल्या मातृभूमीच्या पवित्र वारशाचे महत्त्व सांगणारे आणि जागतिक समृद्धीसाठी प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित केले शेअर

May 21st, 09:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले. यात म्हटले आहे की, आपली मातृभूमी ही अध्यात्मिक साधना आणि उपासना, तसेच धैर्य, सामर्थ्य आणि वैश्विक कल्याणाची पवित्र भूमी राहिली आहे. महान वारसा आणि प्राचीन संस्कृती असलेली ही पवित्र भूमी सर्वांना सदैव सुख आणि समृद्धीने परिपूर्ण ठेवो, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान 10 आणि 11 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर

May 09th, 11:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 मे 2026 रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 10 मे रोजी उशिरा रात्री त्यांचे जामनगरमध्ये आगमन होईल. त्यानंतर, 11 मे रोजी सकाळी साधारण 10:15 वाजता पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होतील. तिथला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान वडोदरासाठी रवाना होतील. संध्याकाळी साधारण 6 वाजता त्यांच्या हस्ते सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होईल. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 17th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात केलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी एमजीआर यांच्या बहुआयामी वारशाचा गौरव केला आहे, तसेच तमिळनाडूच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि तमिळ संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले आहेत.

आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 03rd, 09:35 am

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन

August 03rd, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.