पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा अय्यंकली यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
August 28th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा अय्यंकली यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी महात्माजींचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचे एक चिरस्थायी प्रतीक म्हणून स्मरण केले. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा अय्यंकली यांच्या शिक्षण आणि समानतेप्रती असलेल्या अढळ वचनबद्धता अधोरेखित केली. त्यांचा वारसा देशाच्या समावेशक प्रगतीच्या प्रवासाला निरंतर प्रेरणा देत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.अहमदाबाद येथील कन्या वसतिगृह - सरदारधाम दुस-या टप्प्याच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 24th, 10:39 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सरदारधामचे प्रमुख गगजी भाई, विश्वस्त व्ही. के. पटेल, आणि इतर सर्व मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधून भगिनींनो, विशेषत्वाने प्रिय कन्या !!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह येथील भूमिपूजन सोहळ्यातील भाषण
August 24th, 10:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह भूमिपूजन सोहळ्यास व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे तितकेच त्याचे कार्यही पवित्र आहे. मुलींच्या शिक्षण व सेवेसाठी समर्पित अशा या वसतिगृहाच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आपल्या सोबत स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन येतील व त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर संधी येथे उपलब्ध होतील. या मुली आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्यानंतर स्वाभाविकपणे राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतील तसेच त्यांचे कुटुंबही सक्षम होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वसतिगृहात प्रवेश मिळविणाऱ्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवावर्गाला येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत स्वतःचा उकर्ष आणि शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित केले
April 01st, 12:05 pm
देशभरातील युवा मित्र उन्हाळी सुट्टीसाठी सज्ज झाले असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुलांनी आपला सुट्टीचा कालावधी मौज, शिक्षण आणि वैयक्तिक उत्कर्षासाठी व्यतीत करण्यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले आहे.