उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 11th, 11:00 am
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
April 11th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.पंतप्रधान 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार
October 19th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 19th, 09:22 pm
केंद्रीय मंत्रिमंडळाने वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) मांडलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या प्रस्तावात विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी, अॅप्रनचा (विमाने उभी करण्याच्या जागेचा) विस्तार, धावपट्टीचा विस्तार, टॅक्सीसाठी समांतर मार्गिका आणि इतर संलग्न कामांचा समावेश आहे.