Prime Minister Speaks with Crown Prince of Kuwait
March 18th, 06:20 pm
PM Modi spoke with HH Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah, Crown Prince of Kuwait and conveyed Eid greetings. During the conversation, the two leaders exchanged views on the situation in West Asia and emphasized the importance of safe and free navigation through the Strait of Hormuz. The PM reiterated India’s condemnation of the attacks on Kuwait and thanked him for the continued support provided to the Indian community in Kuwait.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांसमवेत साधला संवाद
March 03rd, 07:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 12th, 04:54 pm
आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 12th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मधील भाषण
March 06th, 08:05 pm
एक प्रकारे युवकांच्या सहभागाने आपण सर्व बंधने तोडू शकतो, सीमा ओलांडून जाऊ शकतो, आणि मग असे कोणतेही लक्ष्य शिल्लक राहत नाही जे साध्य करता येणार नाही . असे कोणतेही ध्येय उरत नाही ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही. रिपब्लिक टीव्हीने या शिखर परिषदेसाठी एका नवीन संकल्पनेवर काम केले आहे. या शिखर परिषदेच्या यशासाठी मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो, तुमचे अभिनंदन करतो. बरं, यात माझाही थोडासा स्वार्थ आहे, एक तर गेल्या काही दिवसांपासून माझा प्रयत्न आहे की मला एक लाख तरुणांना राजकारणात आणायचं आहे आणि ते एक लाख असे असतील ज्यांच्या कुटुंबातील कुणीही आजवर राजकारणात आलेले नसतील, ते युवकच प्रथम येणारे असतील, त्यामुळे एक प्रकारे हा कार्यक्रम माझ्या या उद्दिष्टाला अनुरूप पार्श्वभूमी तयार करत आहे. दुसरे म्हणजे, माझा वैयक्तिक फायदा असा आहे की जे 2029 मध्ये मतदान करण्यासाठी जातील त्यांना माहित नाही की 2014 पूर्वी वर्तमानपत्रातील मथळे काय असायचे , हे त्यांना माहीत नाही . 10-10, 12-12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे हे त्यांना माहीत नाही आणि जेव्हा ते 2029 मध्ये मतदान करायला जातील तेव्हा त्यांच्यासमोर तुलना करण्यासाठी काहीही नसेल आणि म्हणूनच मला ती कसोटी पार करायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे जे वातावरण तयार होत आहे , ही जी पार्श्वभूमी तयार होत आहे ती हे काम नक्की करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 ला संबोधित केले
March 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे आयोजित रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मध्ये भाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुलभूत पातळीवर युवकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि महत्त्वाची हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासाठी रिपब्लिक टीव्ही या वाहिनीने स्वीकारलेल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाबद्दल वाहिनीच्या संचालकांचे अभिनंदन केले. जेव्हा देशातील तरुण राष्ट्रीय चर्चांमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यातून संकल्पनांमध्ये नाविन्य निर्माण होते आणि संपूर्ण वातावरण तरुणांच्या उर्जेने भरून जाते, असे मत त्यांनी नोंदवले. ही उर्जा आत्ता या कार्यक्रमात जाणवते आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. पंतप्रधान पुढे म्हणाले की, तरुणांचा सहभाग सर्व प्रकारचे अडथळे पार करण्यात आणि बंधनांच्या पलीकडचा विचार करण्यात सहाय्यक ठरतो आणि त्यामुळे प्रत्येक ध्येय साध्य करण्याजोगे आणि प्रत्येक इच्छित लक्ष्य गाठ्ण्याजोगे होऊन जाते. अशा पद्धतीच्या परिषदेची नवी संकल्पना राबवल्याबद्दल त्यांनी रिपब्लिक टीव्ही वाहिनीची प्रशंसा केली आणि या उपक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवकांना भारताच्या राजकारणात आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद
January 10th, 02:15 pm
निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो आणि उरलेला महिना काहीच करत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक निखिल कामत यांच्यासोबत साधला संवाद
January 10th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार निखिल कामत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. अतिशय मोकळेपणाने झालेल्या या संवादात त्यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहराशी त्यांचे फार पूर्वीपासून असलेले संबंध अधोरेखित केले.. त्यांनी नमूद केले की, गायकवाड राज्यातील वडनगर हे गाव तलाव, पोस्ट ऑफिस आणि लायब्ररी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह शिक्षणाच्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. गायकवाड राज्य प्राथमिक शाळा आणि भागवताचार्य नारायणाचार्य हायस्कूलमधील शालेय दिवसांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. वडनगरमध्ये बराच काळ व्यतीत करणारा चिनी तत्ववेत्ता झुआंगझांग यांच्यावरील चित्रपटाबद्दल त्यांनी एकदा चिनी दूतावासाला कसे लिहिले याची एक मनोरंजक कथा त्यांनी सामाईक केली. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला, ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान झाले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झु आंग झांग आणि त्यांच्या दोन मूळ शहरांमधील ऐतिहासिक संबंधाचा हवाला देत गुजरात आणि वडनगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे बंध दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि मजबूत संबंधांना अधोरेखित करत आहेत.संयुक्त निवेदन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शासकीय कुवेत दौरा (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 07:46 pm
कुवेतचे महामहीम अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21-22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचा शासकीय दौरा केला. हा त्यांचा पहिला कुवेत दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2024 ला कुवेत मध्ये 26 व्या अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटन समारंभात अमीर शेख मेशल अल -अहमद अल-जबर अल-सबाह यांचे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कुवेतच्या पंतप्रधानांची भेट
December 22nd, 06:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि परस्पर संबंध यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठीच्या आराखड्यावर चर्चा केली.फलनिष्पत्तींची यादी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेतला भेट (डिसेंबर 21-22, 2024)
December 22nd, 06:03 pm
हा सामंजस्य करार संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला संस्थात्मक रूप प्रदान करेल. सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कर्मचारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त सराव, संरक्षण उद्योगात सहकार्य, संरक्षण उपकरणांचा पुरवठा तसेच संशोधन आणि विकासामध्ये सहकार्य यांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या युवराजांची भेट
December 22nd, 05:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे युवराज महामहीम शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबा यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सप्टेंबर 2024 मध्ये यूएनजीए सत्राच्या वेळी महामहीम युवराजांसोबत झालेल्याल भेटीच्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला.पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या अमीरांची भेट
December 22nd, 05:08 pm
यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि कुवेतमधील मजबूत, ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा केली. तसेच द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी व दृढ करण्यासाठी आपली पूर्ण वचनबद्धता व्यक्त केली. या अनुषंगाने, द्विपक्षीय संबंधांना ‘कूटनीतिक भागीदारी’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
December 22nd, 04:37 pm
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते.Prime Minister attends Arabian Gulf Cup as Guest of Honour of His Highness the Amir of Kuwait
December 21st, 10:24 pm
On the invitation of His Highness Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah, the Amir of Kuwait, Prime Minister Shri Narendra Modi attended the opening ceremony of the 26th Arabian Gulf Cup in Kuwait as his ‘Guest of Honour’.रामायण आणि महाभारताच्या अरबी भाषेतील भाषांतराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची केली प्रशंसा
December 21st, 07:03 pm
रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर करून, हे भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल - बरौन आणि अब्दुल लतीफ अल - नसेफ यांची प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांनी कुवेतमधील लेबर कॅम्पला दिली भेट
December 21st, 07:00 pm
कुवेत भेटीच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील मीना अब्दुल्ला भागातल्या लेबर कॅम्पला भेट दिली, जिथे जवळजवळ 1500 भारतीय नागरिक काम करतात. पंतप्रधानांनी भारतातील विविध राज्यांतून तिथे आलेल्या मजुरांशी संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली.कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादाचा कार्यक्रम ‘हाला मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 21st, 06:34 pm
मी आत्ताच अवघ्या अडीच तासांपूर्वी कुवेतला पोहोचलो आणि इथे पाऊल ठेवल्यापासून आजूबाजूला एक वेगळीच आपुलकी, एक वेगळीच मायेची ऊब जाणवत आहे. तुम्ही सर्व भारतातील विविध राज्यांतून आला आहात. पण तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की जणू भारताचे लघुरूपच (मिनी इंडिया) माझ्यासमोर उभे राहिले आहे. इथे भारताच्या उत्तर-दक्षिण-पूर्व पश्चिमे कडील प्रत्येक प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक माझ्यासमोर दिसत आहेत. पण प्रत्येकाच्या हृदयात एकच पडसाद आहे…. प्रत्येकाच्या हृदयात एकच निनाद आहे - भारत मातेचा विजय असो….,.भारत मातेचा विजय असो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या कार्यक्रमात भारतीय समुदायाला केले संबोधित
December 21st, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतमधील शेख साद अल - अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या, कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाला संबोधित केले. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त
December 21st, 06:16 pm
कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.